आजची यशोगाथा : मिलिंद करंदीकर (२४ ऑक्टोबर २०२६)

0

आजची यशोगाथा : मिलिंद करंदीकर (२४ ऑक्टोबर २०२६)

परिचय पत्र

नाव: मिलिंद करंदीकर
वय: ५९ वर्षे
उंची: १७५ सेंटीमीटर
वास्तव्य: ठाणे, महाराष्ट्र
व्यवसाय: स्वयंरोजगार
समूह: चॅलेंज ९, बिल्डर्स
मोबाईल: ९८१९४१०५६८

मला डॉ. दीक्षित लाइफस्टाइल आणि ९० दिवसांचे वजन कमी करणे व मधुमेह नियंत्रणासाठीचे चॅलेंज याविषयी यूट्यूबवरून माहिती मिळाली.
हे चॅलेंज १४ जुलै २०२६ पासून सुरू होणार असल्याचे समजल्यानंतर मी पूर्ण निष्ठेने आणि समर्पित भावनेने त्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला.
या संपूर्ण कार्यक्रमादरम्यान मी शिस्त आणि सातत्य राखले. माझ्या जेवणाचे फोटो पाठवणे तसेच व्यायाम आणि शारीरिक हालचालींची माहिती नियमितपणे देणे, याचे मी पालन केले. कार्यक्रमात शिकवलेल्या आरोग्यदायी जीवनशैलीच्या सवयी अंगीकारून मी दिवसातून दोन वेळा जेवण्याची शिस्त पाळली आणि खाण्याची अनावर इच्छा कशी नियंत्रित करावी, हे शिकलो.
माझी प्रगती आणि परिणाम:
या चॅलेंजदरम्यान माझ्या आरोग्याशी संबंधित काही महत्त्वाच्या निकषांमध्ये सुधारणा झाल्याचे मला जाणवले. यामध्ये एचबीएवनसी, उपाशीपोटी इन्सुलिन आणि कंबरेचा घेर यांचा समावेश आहे.

९० दिवसांच्या चॅलेंजमधील माझे परिणाम:
एचबीएवनसी: ६.७% → ६.४%
वजन: ७८.० किलो → ७६.५ किलो
उपाशीपोटी इन्सुलिन: ११.६० → ३.७३ मायक्रोआययू/मिली
कंबरेचा घेर: ९० सेंटीमीटर → ८९ सेंटीमीटर
नोंदवलेल्या कालावधीत माझे वजन, एचबीएवनसी, उपाशीपोटी इन्सुलिन आणि कंबरेचा घेर यांमध्ये घट झाल्याचे या परिणामांवरून दिसून येते.
मला मिळालेली सर्वांत मोठी शिकवण:
या प्रवासात मला मिळालेली सर्वांत महत्त्वाची शिकवण म्हणजे खाण्याची अनावर इच्छा नियंत्रित करणे आणि दिवसातून फक्त दोन वेळा जेवण्याची शिस्त अंगीकारणे.
या अनुभवामुळे मधुमेहाचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि एकूण आरोग्य सुधारण्यासाठी सातत्य, आत्मशिस्त आणि आरोग्यदायी जीवनशैलीच्या सवयी किती महत्त्वाच्या आहेत, हे मला समजले.
सर्वांसाठी माझा संदेश:
शिस्त, सातत्य आणि योग्य मार्गदर्शन यांच्या मदतीने आरोग्यामध्ये लक्षणीय सुधारणा घडवून आणणे शक्य आहे. आपल्या आरोग्यसुधारणेच्या प्रवासाला सुरुवात करा, त्यात सातत्य ठेवा आणि आरोग्यदायी सवयी आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवा!
या संपूर्ण प्रवासात सातत्याने मार्गदर्शन, प्रेरणा आणि प्रोत्साहन दिल्याबद्दल मी डॉ. दीक्षित सर, श्रीमती पद्मा बी. आर. आणि श्री भालचंद्र बैलूर यांचे मनःपूर्वक आभार मानतो.
या चॅलेंजदरम्यान मला सहकार्य करणाऱ्या संपूर्ण टीमचा आणि सहप्रवाशांचाही मी ऋणी आहे.

(मराठी अनुवाद: डॉ. रत्नाकर गोरे)

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts