आजची यशोगाथा : विकास कारंडे (२२ ऑक्टोबर २०२६)

0

आजची यशोगाथा : विकास कारंडे (२२ ऑक्टोबर २०२६)

परिचय पत्र

नाव: विकास कारंडे
वय: ४१ वर्षे
उंची: १६३ सेमी
वास्तव्य: नवी मुंबई
व्यवसाय: शासकीय नोकरी
समूह:- चॅलेंज ९, चॅम्पियन्स
मोबाईल: ९५२७२८४१४२

मला विलासी जीवनशैली, नोकरीच्या ठिकाणी बैठी कामकाज पद्धती तसेच व्यायामाच्या अभावामुळे माझे वजन जवळपास ७८ किलो इतके प्रचंड वाढले होते. त्यामुळे मला दैनंदिन शारीरिक हालचाली करताना अडचणी येत होत्या. त्यात मला वजनामुळे सतत आळस, प्रचंड घाम आणि थकवा येत असल्याने अपुऱ्या हालचालीमुळे वजन आणखी वाढू लागले होते. त्यामुळे माझ्या स्वभावात चिडचिडपणा वाढला होता.

माझे वजन प्रचंड वाढलेच होते आणि त्याचे दुष्परिणाम माहीत असूनही मी अनेकवेळा वजन कमी करण्यासाठी योग्य मुहूर्ताची वाट बघत होतो.
मी वेगवेगळ्या इंस्टाग्राम/युट्यूब चॅनेलवर वजन कमी करण्यासाठी उपायांचा शोध घेणे सुरु केले. त्यावेळी यूट्यूब च्या माध्यमातून मला सदर 90 दिवसांच्या चॅलेंजबाबत समजले

हे चॅलेंज दिनांक १६ जुलै, २०२६ पासून सुरू होणार असल्याचे कळल्यावर मी ठाम निर्णय घेतला. परंतु, माझ्या कुटुंबीय आणि मित्रांना याबाबत खात्री नव्हती, विशेषतः या कालावधीत श्रावण महिन्यातील आणि मुख्य गणपती उत्सवात गोड पदार्थांना महत्व असल्याने या सणांमध्ये कुठलाही संयम ढळू न देता पण मी पूर्ण मनाने हे चॅलेंज करण्याचे ठरवले.

हे चॅलेंज सुरू झाल्यावर मी दोन्ही वेळच्या जेवणाचे फोटो शेअर केले. सोबत व्यायाम/क्रियाकलाप नियमित अपडेट केले. प्रोग्राममध्ये शिकवलेल्या सवयी अंगीकारल्या. त्यानुसार दिलेल्या आवश्यक सुचनेनुसार आता मला कडक भुकेच्या दोन वेळी जेवणे, आहारातील अन्नपदार्थांचा खाण्याचा क्रम, सोबत ४५ मिनिटांत कमीतकमी साडे चार किलोमीटर चालणे, आहारातून गोड पदार्थ पूर्ण वर्ज्य करणे, खाण्यामध्ये कर्बोदकांचे प्रमाण कमी करून त्याऐवजी प्रथिनांचा समावेश करण्याचा उत्तम आहार सल्ला देण्यात आला. मी तो तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न केला.

सलग तीन महिने सातत्यपूर्ण प्रयत्न आणि आदरणीय ऍडमिन्स यांच्या प्रेरणेने तथा मार्गदर्शनामुळे दिनांक १३ ऑक्टोबर, २०२६ रोजी म्हणजेच तीन महिन्याने माझ्या चाचण्यांचे अहवाल तपासले आणि आनंदाची बाब म्हणजे ते अतिशय सकारात्मक आले; त्यामुळे माझा उत्साह वाढला आणि या जीवनशैलीविषयी माझी श्रद्धा अधिक दृढ झाली.

माझे एचबीए1सी ६.० वरून कमी होऊन तो ५.६% इतके, तर माझे उपाशीपोटी इन्सुलिन १८.२९ वरून १० इतके कमालीचे घटले.
मी प्रि डायबेटीक वरून नॉन डायबेटीक बनलो याचा खूप आनंद झाला.
तसेच, माझा रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल एकदम देखील नियंत्रणात आले.

माझे वजन १६ जुलै, २०२६ रोजी ७७.६ किलो होते; ते १३ ऑक्टोबर, २०२६ रोजी (३ महिन्यात) जवळपास ७.६ किलोने कमी म्हणजे ७० किलो इतके झाले.

पोटाचा घेर ९४ सेंमी वरून ८६ सेंमी झाला.

आता माझे कार्यालयीन सहकारी, मित्र आणि नातेवाईक माझ्या या बदलाने आश्चर्यचकीत होऊन मला आवर्जून भेटायला येतात आणि या बदलाचे, उत्साहाचे रहस्य विचारतात तेव्हा मी सर्वांना ही जादू केवळ आणि केवळ डॉ. दीक्षित सर यांच्या जीवनशैलीमुळे सर्वांना सहज शक्य आहे असा विश्वास देतो आणि त्यांनादेखील या जीवनशैलीविषयी माहिती देतो.

मी आदरणीय डॉ. दीक्षित सर, सौ.पूजा मॅडम आणि श्री. सागर सोनवणे सर यांचा मी सदैव ऋणी राहीन. तसेच, मला प्रेरणा आणि साथ देणारी माझी पत्नी दिपाली हिला देखील मी धन्यवाद देतो.

(मराठी संकलन: डॉ रत्नाकर गोरे)

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts