आजची यशोगाथा : सुनीता घोंगडे

0

आजची यशोगाथा : सुनीता घोंगडे

परिचय पत्र

नाव: सुनीता घोंगडे
वय: ५६ वर्ष
उंची: १५२ सेमी
व्यवसाय: गृहिणी
वास्तव्य: जळगाव
समूह: एक्सप्लोरर्स
मोबाईल: ९६०७७५७७६५
 

मला बऱ्याच वर्षांपासून वजन वाढ, सांधेदुखी,स्लीप डिस्क, पुर्ण अंगावर सुज येणे.इ.समस्यांमुळे दैनंदिन जीवनात खुप अडचणी येत होत्या. मला मा. डॉ. दीक्षित सर लाईफस्टाईल आणि 90दिवसांचे चॅलेंज बद्दल युट्यूब वर संपुर्ण माहिती मिळाली. हे चॅलेंज 1फेब्रुवारी2026पासुन सुरू होणार असल्याचे समजले. मी ठाम निर्णय घेतला व चॅलेंजला सुरुवात केली.मी शिस्त पाळली. जेवणाचे फोटो शेअर केले. व्यायाम/क्रियाकलाय अपडेट केले.प्रोग्राम मध्ये सांगितलेल्या सवयी अंगिकारल्या. पहिल्या महिन्यात माझे वजन कमी झाले, पोटाचा घेर कमी झाला, उत्साह वाढला. मला माझ्यात सकारात्मक बदल दिसून आला. पुढिल महिन्यात अजुनच फरक वाटला व उत्साह वाढु लागला.दररोज सकाळी 5ते 5.30कि.मी.चालणे.घरी आले की योग करणे दिवसाला फक्त दोन वेळा सांगितल्या प्रमाणेच जेवणे.मध्ये ग्रीन टी किंवा पातळ बिना साखरेचा चहा पिणे हा दिवसाचा दिनक्रम होता.मी १ फेब्रुवारी ते 30 एप्रिल या तीन महिन्यांत सांगितल्याप्रमाणे दिनचर्या सुरू ठेवली आणि एप्रिल अखेर माझे वजन, पोटाचा घेर, एचबीएवनसी ,सर्व बॉडी पॅरामिटर्स मधील एक सकारात्मक बदल समोर आला. 90दिवसानंतरचे माझे एचबीएवनसी ५.३ एवढे होते. माझे वजन ५९.५० वरून ५६ किलो झाले आहे. माझ्या पोटाचा घेर ८०सेमी .वरून ७७ सेमी .झाला आहे आणि फास्टिंग इन्सुलिन ७.७० वरून ५.९४ येवढे कमी झाले आहे.
या तीन महिन्यात माझी औषधी फारच कमी झाली,सुज कमी झाली,मॉयग्रेनचा त्रास कमी झाला.उत्साह वाढला, शरीर हलके वाटते.ह्या तीन महिन्यांच्या चॅलेंज पासुन माझ्यात अनेक सकारात्मक बदल दिसून आले.माझा आत्मविश्वास वाढला.या संपूर्ण प्रवासात सातत्याने मार्गदर्शन दिल्या बद्दल मी आदरणीय डॉ. दीक्षित सर आणि एक्सप्लोरर ग्रुपचे ॲडमिन मनिषा जगताप मॅडम आणि विजय शेळके सर यांचे मनापासून खुप खुप आभार मानते.
सरांचे तीन महिन्यांचे चॅलेंज प्रामाणिकपणे पुर्ण केल्यास निश्चितच ध्येय साध्य होते.हे मी स्वतः खात्रीने सांगू शकते.

(मराठी संकलन: मीनल डोणगावकर)

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts