आजची यशोगाथा : संतोष खर्शीकर (३० जुलै २०२६)

0

आजची यशोगाथा : संतोष खर्शीकर (३० जुलै २०२६)

परिचय पत्र

*नाव:* संतोष खर्शीकर
*वय:* ५३ वर्षे
ई मेल : santoshguruji30@gmail.com
*निवास:* पुणे
*व्यवसाय:* व्यवसाय
*ग्रुप:* अचिव्हर्स
मोबाईल : 8149117428

वजन वाढल्यामुळे माझ्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत होता. वेट लॉस चॅलेंज ७ मध्ये चांगले परिणाम मिळाल्यानंतर माझे आदर्श वजन गाठण्याचा निर्धार केला आणि १ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू झालेल्या ९० दिवसांच्या डॉ. दीक्षित लाइफस्टाइल चॅलेंजमध्ये सहभागी झालो.

या वेळी मी पूर्ण समर्पणाने सहभागी झालो. नियमितपणे जेवणाचे फोटो, चालण्याचे अपडेट्स शेअर केले आणि कार्यक्रमातील सर्व शिस्त पाळली. पहिल्या महिन्यात फक्त ७५० ग्रॅम वजन कमी झाले, पण ग्रुपमधील सकारात्मक वातावरण आणि इतर सदस्यांची प्रगती पाहून माझा उत्साह कायम राहिला. नियमित चालण्यामुळे मी ताजेतवाने आणि उत्साही वाटू लागलो.

दुसऱ्या महिन्यात वजन आणि कंबरेचा घेर लक्षणीयरीत्या कमी झाला. या काळात गिरनारला प्रवास करून मी कोणताही त्रास न होता गिरनार चढू शकलो, हा माझ्यासाठी मोठा आत्मविश्वास देणारा अनुभव होता. माझी पत्नीही या चॅलेंजमध्ये सहभागी होती. तिने वेळेवर जेवणाची उत्तम काळजी घेतल्यामुळे मला सातत्य राखणे सोपे गेले.

९० दिवसांनंतर माझे परिणाम:

* *HbA1c:* ५.१ → ५.५
* *वजन:* ८५ → ८०.४५ कि.ग्रॅ.
* *कंबरेचा घेर:* १०७.३७ → ९९ से.मी.
* *फास्टिंग इन्सुलिन:* ३७.४ → ९.६५

याशिवाय ऍसिडिटी कमी झाली असून मी अधिक ताजेतवाने, उत्साही आणि सक्रिय वाटत आहे. सातत्य हेच उत्तम आरोग्याचे रहस्य आहे, ही माझी सर्वात मोठी शिकवण ठरली.

डॉ. दीक्षित, ग्रुप अॅडमिन श्रीकांत डंके , अंजली मॅडम, बोडस सर आणि सर्व कोअर कमिटी सदस्यांचे मनःपूर्वक आभार. पुढेही डॉ. दीक्षित लाइफस्टाइलचे पालन करून अधिक निरोगी जीवन जगण्याचा माझा निर्धार आहे.

धन्यवाद डॉ. दीक्षित आणि डॉ. दीक्षित लाईफ स्टाईल
संतोष खर्शीकर
मराठी अनुवाद : रविंद्र ढवळीकर

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts