आजची यशोगाथा : सागर पाटील
परिचय पत्र
नाव: सागर पाटील
वय: ४९ वर्षे
उंची: १७७ सेमी
वास्तव्य: पुणे
व्यवसाय: व्यवसाय – स्वयंरोजगार
समूह: अचीव्हर्स
मोबाईल: ९६०४३०२९२८
मला कोणताही क्रॅश डाएट न करता वजन कमी करण्याचा कार्यक्रम हवा होता. यूट्यूबच्या माध्यमातून मला डॉ. दीक्षित जीवनशैली आणि ९० दिवसांच्या चॅलेंजची माहिती मिळाली. हे चॅलेंज १.२.२६ पासून सुरू होणार असल्याचे समजताच मी त्यात सहभागी होण्याचा ठाम निर्णय घेतला. मी आणि माझ्या पत्नीने मिळून या चॅलेंजची नोंदणी केली. मी पूर्णपणे कटिबद्ध राहिलो — जेवणाचे फोटो शेअर करणे, व्यायामाचे अपडेट्स देणे आणि कार्यक्रमात शिकवलेली शिस्त पाळणे. पहिल्या महिन्यात माझे २.१ किलो वजन कमी झाले आणि ऊर्जा पातळीत वाढ झाली. पुढील महिन्यांमध्ये आणखी १.८ किलो वजन कमी झाले.
९० दिवसांच्या शेवटी:
एचबीएवनसी: [५.७%] → [५.६%]
वजन: [८७.३ किलो] → [८०.८ किलो]
कंबर: [१०६.६८ सेमी] → [९२.२५ सेमी]
फास्टिंग इन्सुलिन: [७.७] → [६.३]
इतर सुधारणा: ऊर्जा वाढली आणि शरीराची लवचिकता अधिक चांगली झाली. माझ्यासाठी सर्वात मोठी जाणीव म्हणजे मला खाण्याच्या इच्छांवर नियंत्रण मिळवता आले, शिस्त अंगीकारता आली आणि सकारात्मक मानसिकता विकसित झाली. साखर घातलेला दुधाचा चहा नियमितपणे पिणे मी कधी थांबवू शकेन, यावर माझाच विश्वास बसत नव्हता. पण ही सवय अवघ्या ३० दिवसांत पूर्णपणे गेली.
मी डॉ. दीक्षित आणि टीममधील सर्व सदस्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. त्यांनी सतत मार्गदर्शन केले, पाठिंबा दिला, व्हॉट्सअॅप ग्रुपवर आमचे नियमित निरीक्षण केले आणि वैयक्तिक संदेश पाठवून आम्हाला योग्य मार्गावर राहण्यासाठी प्रेरित केले.
या ९० दिवसांच्या प्रवासात आमच्याशी संयमाने वागल्याबद्दल आणि सतत आमच्यासोबत राहिल्याबद्दल आम्ही डॉ. दीक्षित सर आणि त्यांच्या टीमचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. आम्ही खात्री देतो की पुढेही हीच जीवनशैली कायम ठेवू. आम्ही आणखी ८ ते १० किलो वजन कमी करून उत्तम ऊर्जा पातळी प्राप्त करू.
(मराठी अनुवाद: डॉ. रत्नाकर गोरे)


