आजची यशोगाथा : मानसी घोडके ( १० जून २०२६ )

0

आजची यशोगाथा : मानसी घोडके ( १० जून २०२६ )

परिचय पत्र

नाव: मानसी घोडके
वय: ५३ वर्षे
उंची: १४५ से.मी.
वास्तव्य: पिंपरी चिंचवड पुणे
व्यवसाय: गृहिणी
समूह: अचीव्हर्स
मोबाइल: ९८८१०२१८६२

गेल्या दोन वर्षांपासून माझे युरिक अॅसिड वाढल्याने तसेच मला थायरॉईड असल्याने माझे वजन ६०.८ किलो वर गेले होते. काही केल्या एक कमी होत नव्हते, शिवाय आळस होत होता, शरीर जड वाटायचे, चालताना पाय दुखायचे. हे सगळं पाहता माझ्या मिस्टरांनी मला डॉक्टर दीक्षित यांच्या ९० दिवस चॅलेंज विषयी सांगितले व त्यांनी एक फेब्रुवारी २०२६ रोजी माझे नाव नोंदवले. अशा तऱ्हेने मी या चॅलेंजमध्ये सहभागी झाले.
सुरुवातीला मला चालायचा फार कंटाळा यायचा, परंतु ग्रुप मध्ये सर्व सदस्य आपापली अॅक्टिव्हिटी नोंद करायचे. ते पाहून मला असे वाटू लागले की, आपल्यापेक्षा वयाने मोठे असलेले सदस्य हे करू शकतात, तर मग आपण का नाही. मग मनाशी निश्चय केला, की आपणही चॅलेंज पूर्ण करायचे, आणि मग काय. मी ते सातत्याने करू लागले. चार किलोमीटर चालू लागले. जेवणाचे फोटो ग्रुप वर शेअर करू लागले.
एडमिन डंके सर आणि अंजली मॅडम यांनी आपली डायटप्लॅन कशी असावी, व ४५ मिनिटात साडेचार किलोमीटर कशा पद्धतीने पूर्ण करावे याचे मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनानुसार मी माझी अॅक्टिव्हिटी सुरू ठेवली, त्यामुळे अवघ्या तीन महिन्यात माझे वजन ६०.७ वरून ५६.७ किलो वर आले. व व माझे एचबीएवनसी ५.९ वरून ५.६% वर आले. माझ्या कमरेचा घेर ९७ वरून ९२ सेमी वर आला. चालताना माझे पाय दुखायचे ते पूर्णपणे थांबले. मला आता खूप मोकळे आणि उत्साही वाटू लागले आहे.

माझ्या या बदललेल्या यशस्वी जीवनशैलीचे पूर्ण श्रेय डॉक्टर दीक्षित सर, एडमिन डंके सर, अंजली मॅडम, मेधा मॅडम यांना देते. त्याबद्दल मी या सर्वांची खूप खूप आभारी आहे.
या अभियानाचा मला खूप फायदा झाला त्यामुळे मी ही जीवनशैली यापुढेही सातत्याने चालू ठेवण्याचा संकल्प करत आहे.

(मराठी संकलन: डॉ रत्नाकर गोरे)

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts