आजची यशोगाथा : यदुनाथ वसंतराव महाराज

0

आजची यशोगाथा : यदुनाथ वसंतराव महाराज

परिचय पत्र

नाव : यदुनाथ वसंतराव महाराज
वय: ६२ वर्षे
उंची: १६२ सेंमी
व्यवसाय: सेवानिवृत्त (सहा. अधीक्षक, न्यायालय विभाग)
वास्तव्य: हरंगुळ, लातूर जिल्हा
ग्रुप : गार्डियन ग्रुप, ९वा चॅलेंज
मोबाईल: ७७९६७९३२५३

माझे एप्रिल २०१९ मध्ये बायपास ऑपरेशन झाले आहे. नुकतेच दोन्ही डोळ्यांचेही मोतीबिंदू ऑपरेशन झाले आहे. मला शुगर व बीपी चा त्रास होता. तसेच सांधेदुखी ही होती. उशिरा उठण्याची सवय होती त्यामुळे व्यायाम टाळण्याचा प्रयत्न करत होतो. या सर्व समस्येमुळे मला जीवनात खूप अडचणी येत होत्या. ७ व्या चॅलेंज मध्येही मी भाग घेतला होता, त्यावेळी मी प्री-डायबेटीक स्टेज मध्ये आलो होतो पण खाण्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे थोडे वजन वाढले होते आणि शुगर पण वाढली.

मला डॉ. दीक्षित जीवनशैली आणि ९० दिवसाचे चॅलेंजबद्दल वंदना जोशी मॅडम, नाशिक यांच्याकडून माहिती मिळाली. हे चॅलेंज १६.०७.२०२६ पासून सुरु होणार असल्याचे कळल्यावर मी ठाम निर्णय घेतला. कुटुंबियांना खात्री नव्हती. विशेषत: रक्षाबंधन, गणेशचतुर्थी व महालक्ष्मीपूजन सारख्या सणामुळे, पण मी पूर्ण मनाने हे चॅलेंज करण्याचे ठरवले.

चॅलेंज मध्ये मी पूर्ण शिस्त पाळण्याचा प्रयत्न केला. जेवणाचे फोटो शेअर केले. व्यायाम/क्रियाकलाप अपडेट केले. प्रोग्राममध्ये शिकवलेल्या सवयी अंगीकारल्या. बायपास ऑपरेशन झाल्यामुळे सुरुवातीला चालण्याचा वेग कमी होता. पण ग्रुप अॅडमिन चे प्रोत्साहन आणि इतर सहभागीकडून प्रेरणा घेवून रोज थोडे थोडे अंतर आणि वेग वाढविण्याचा प्रयत्न केला.

पहिल्या महिन्यात वजन कमी झाले, साखरेचे प्रमाण कमी झाले. असा बदल झाला. पुढील महिन्यामध्ये अजून प्रगती झाली, जसे की, वजन कमी झाले. चांगले ब्लड रिपोर्ट्स आले, जीवनशैलीत बदल झाले.

९० दिवसानंतर अंतिम निकाल खालील प्रमाणे-
एचबीए१सी :- ७.५ वरुन ६.८% (०.७% कमी)
वजन :- ७१ किग्रा वरुन ६६.९ किग्रा (४.१० किलो कमी)
कंबरेचे माप:- ९७ सेंमी वरुन ९२ सेंमी (५ सेंमी कमी),
फास्टींग इन्सुलिन :- ८.२ वरुन ७.३७ यूनिट झाले (०.६५ यूनिट कमी).

इतर सुधारणा- उर्जा वाढली, वेदना कमी झाल्या. आळस निघून गेला.

माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी जाणीव म्हणजे खाण्याच्या लालसेवर नियंत्रण मिळाले. शिस्त अंगीकारली. माझ्या मनोवृत्तीत सुधारणा झाली.
या संपूर्ण प्रवासात सातत्याने मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिल्याबद्दल डॉ. दीक्षित सर, ग्रुप चे अॅडमिन श्री श्रीनिवास बोलाबत्तीन सर, स्वाती कुलकर्णी मॅडम यांचा मी मनापासून आभारी आहे. डॉ. दीक्षितसर आपण जे अमूल्य व स्पृहणीय कार्य विनामूल्य करीत आहात त्याबद्दल तुमंचे खूप खूप आभार व अभिनंदन.

यापुढेही या जीवनशैलीचे पालन करुन इतरांनाही या जीवनशैलीचे फायदे सांगणार आहे. तसेच मधुमेहमुक्त होण्याचे ध्येय लवकरच साध्य करण्यात मी यशस्वी होईनच धन्यवाद.

(मराठी संपादन : श्रीनिवास बोलाबत्तीन)

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts