आजची यशोगाथा : भूषण भार्गवे ( १८ मे २०२६ )

0

आजची यशोगाथा : भूषण भार्गवे ( १८ मे २०२६ )

परिचय पत्र

नाव: भूषण भार्गवे
वय: ४८ वर्षे
उंची: १७१ सेमी
व्यवसाय: नोकरी
*वास्तव्य: नाशिक
मोबाइल: ९४२२२६६४२२

बैठे कामकाज आणि अनियंत्रित आहार यामुळे व्यायाम करुनही माझे वजन, एचबीएवनसी कमी होत नव्हते. सुरुवातीचे काळात मला उच्च रक्तदाब, मधुमेह, कॉलेस्टेरोल आणि थायरॉईड अश्या चार प्रकारच्या गोळया सुरु होत्या. संध्याकाळच्या वेळी रक्तातील साखर कमी होवुन चक्कर येणे, जीव घाबरणे, सतत काहीतरी गोड खाण्याची भावना होणे असे सर्वच त्रास कायम व्हायचे.
डॉ जगन्नाथ दीक्षित यांचे यूटयूबवरील व्हीडीयो पाहून या जीवनशैलीचे पालन करायची इच्छा व्हायची, पण हिम्मत होत नव्हती. मग मला जे शक्य होईल त्याचा ३ ते ७ दिवसांचे प्रयोग करुन पध्दती निश्चित केली. डॉ जगन्नाथ दीक्षित सरांची मनातल्या मनात माफी मागुन दोन वेळा जेवणाच्या पद्धतीमध्ये मला सुसंगत असणारे बदल केले. माझे होमीओपॅथीचे डॉक्टर यांच्या सल्ल्याने वरील सर्व औषधे हळूहळू बंद केलीत.
पुढील आहार पध्दती २५ ऑक्टोबर २०२५ पासून सुरू केली.
1.रात्री शेंगदाणे, मूग भिजवुन सकाळी खाणे. दोन अंडयांचे ऑम्लेट खाणे.
2.दुपारच्या जेवणात भाकरी भाजी. भाजीचे प्रमाण जास्त ठेवले.
3.दिवसभरात चहा बिनासाखरेचा (तीन ते चार वेळा)
4.रात्री जेव्हा प्रचंड भुक लागते तेव्हा. (कपभर गाईचे दुध आणि त्यात गाईचे एक चमचा तुप) अत्यंत हळु म्हणजे घोट घोट घेणे.
5. रात्री नऊ ते साडे नऊ वाजेपर्यंत झोपणे.

रात्री जेवण नसलयाने आणि झोपण्याच्या आधी किमान एक तास मोबाईलचा वापर नसलयाने सात तासांची झोप पुर्ण होवुन पहाटे चार ते पाच च्या दरम्यान आपोआप जाग येते. आणि उत्साहपुर्ण वाटते. सुरुवातीचे सहा महिने गोड पूर्ण वर्ज्य केले. नंतर आवडीनुसार, पण मर्यादेत खायला सुरुवात केली.
पहाटे लवकर जाग आल्यानंतर स्ट्रेचींग, एक दिवसाआड सायकल आणि पोहणे, सोमवारी व्यायामाला विश्रांती, असे नियोजन केले व ते पार पाडत आहे.
आज जवळपास एक वर्ष झाले मला एकही औषध नाही, तसेच महत्वाचे म्हणजे शरीरातील फॅटलॉस जवळपास पुर्ण झाला.
डॉ जगन्नाथ दीक्षित यांच्या मुळे जे पुर्वी मला सल्ला द्यायचे ते आता मला सल्ला विचारतात.
डॉ जगन्नाथ दीक्षित यांचे शतश: आभार.

(मराठी संकलन: डॉ रत्नाकर गोरे)

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts