आजची यशोगाथा : पांडुरंग मुळीक ( ४ मे २०२६ )

0

आजची यशोगाथा : पांडुरंग मुळीक ( ४ मे २०२६ )

परिचय पत्र

नाव: पांडुरंग मुळीक
वय: ६२ वर्षे
उंची: १६२ सेंमी
व्यवसाय: निवृत्त मुख्याध्यापक
वास्तव्य: नवी मुंबई
समूह: ठाणे मुंबई ग्रुप
मोबाईल: ९४०४९९७०९५

निवृत्तीनंतर माझे वजन जवळपास सात किलोने वाढले होते. ६४ किलोच्या आसपास असणारे वजन ७१ किलोपर्यंत झाले होते, त्यामुळे चालताना गुडघेदुखीचा त्रास जाणवत होता. उठताना व बसताना गुडघे दुखत होते. माझ्या पत्नीने सर्वप्रथम २०२३ साली ९० दिवसांच्या वेट लॉस व मधुमेह रिवर्सल आव्हानांमध्ये भाग घेतला होता, तेव्हापासून मला डॉक्टर दीक्षित लाईफ स्टाईल बद्दल माहिती होती.
हे चॅलेंज एक जूनपासून सुरू होणार आहे हे समजल्यानंतर मी ठरवले की आपणही या चॅलेंजमध्ये सहभागी व्हायचे. माझ्या पत्नीने पाचव्या आणि सहाव्या चॅलेंजमध्ये सहभाग घेतला असल्यामुळे मला या जीवनशैलीबद्दल आकर्षण वाटत होते आणि त्याचे फायदे देखील समजले होते. माझ्या पत्नीने प्रयत्नपूर्वक तिचे वजन कमी केले होते, त्यामुळे मला सुद्धा हे शक्य आहे असे वाटू लागले.
मी नियमितपणे चालणे सुरू केले. आमच्या ग्रुप ॲडमिनने केलेल्या मार्गदर्शनानुसार पूर्ण शिस्त पाळली. जेवणाचे फोटो नियमितपणे शेअर केले. दररोज कमीत कमी पाच किलोमीटर व जास्तीत जास्त सात किलोमीटर चालणे चालू ठेवले. दररोज न चुकता चालण्याचा आग्रह माझी पत्नी धरत होती, त्यामुळे पहिल्या महिन्याच्या शेवटी माझे वजन दोन किलोने कमी झाले. दुसऱ्या महिन्याच्या शेवटी वजन आणखी दोन किलोने कमी झाले.

९० दिवसांचे चॅलेंज समाप्त झाले तेव्हा माझे वजन ७१ किलो वरून ६६ किलो पर्यंत म्हणजे तब्बल पाच किलोने कमी झाले. एचबीएवनसी चॅलेंज सुरू होताना ५.५ होते, तेवढेच चॅलेंज समाप्त झाले तेव्हा होते. कंबरेचा घेर ९७ सेंटीमीटर वरून ९१ सेंटीमीटर झाला. वजन कमी झाल्यामुळे अधिक उत्साह वाटू लागला. या लाईफस्टाईलमुळे खाण्यावर नियंत्रण आले. दोन वेळा जेवणाची सवय लागली. आहारातील साखरेचे प्रमाण कमी झाले.
या संपूण कालावधीमध्ये सातत्याने प्रोत्साहन व मार्गदर्शन केल्याबद्दल मी डॉक्टर दीक्षित आणि आमच्या ग्रुपच्या ॲडमिन प्राप्ती गांधी मॅडम, कीर्ती लांड़े मॅडम आणि मयुरेश नातू सर यांचा मनापासून आभारी आहे.
या चॅलेंजमुळे मला जो अनुभव आला, त्याबद्दल मी माझ्या सहकाऱ्यांना, मित्रांना आणि नातेवाईकांना सांगितले. त्यामुळे त्यांनीही डॉक्टर दीक्षित जीवनशैलीचे अनुकरण करणार असल्याचे सांगितले.

(मराठी संपादन: श्री. श्रीनिवास बोलाबतीन)

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts