आजची यशोगाथा : आनंद मेणकुदळे (४ जुलै २०२६)
परिचय पत्र
नाव: आनंद मेणकुदळे
वय: ५५ वर्ष
उंची: १७४ सेंमी
वास्तव्य: पुणे
व्यवसाय: ट्युशन क्लासेस
समूह: Achievers
मोबाईल: ७३७८७१५८५८
मला वजन वाढ, सांधेदुखी, इ.या समस्यांमुळे दैनंदिन जीवनात खूप अडचणी येत होत्या. मी दोन वर्षांपासून डॉ. दीक्षित ह्यांचे यूट्यूब व्हिडिओ पाहत होतो. तेथेच विश्वास सरांचा नंबर मिळाला. त्यांना DRCC, पुणे सेन्टर मध्ये ०८/१२/२०२५ ला भेटून त्यांच्या सर्व सूचनांचे नियमित पालन करण्याचा प्रयत्न केला.
पहिल्याच महिन्यात माझे :
वजन: 3 किलो कमी झाले.
उपाशीपोटी इन्सुलिन: २०.५ वरून ६.९३
एचबीएवनसी: ५.२ वरून ५.१% झाले.
व मी पूर्व-मधुमेही वरून मधुमेह-मुक्त झालो. माझा उत्साह वाढला. मला WhatsApp ग्रुपवर 90 days challenge बद्दल माहिती कळली.
हे चॅलेंज ०१/०२/२०२६ पासून सुरू होणार असल्याचे कळल्यावर मी ठाम निर्णय घेतला. माझ्या पत्नीच्या पूर्ण पाठिंब्यामुळे ठाम व दृढ निश्चियामुळे आम्ही दोघांनीही पूर्ण मनाने हे चॅलेंज करण्याचे ठरवले.
अक्षय तृतीया, गुढी पाडवा, घरातील लग्न कार्य तसेच मधूनच पायातील भयंकर वेदना ह्या सारख्या अनेक बाधा येऊन ही मी पूर्ण शिस्त पाळण्याचा प्रयत्न केला.जेवणाचे फोटो शेअर केले. मला ४.५ किमी. चालण्यासाठी ५०-५५ मिनिटे लागतात.
डॉ. दीक्षित सरांना सेन्टर वर भेटून माझी समस्या सांगितली. त्यांनी मला पाण्यात चालण्याचा, व्यायाम करण्याचा सल्ला दिला व एक वर्षापर्यंत प्रोग्राममध्ये शिकवलेल्या सवयी अंगीकारण्यास सांगितले. माझी प्रगती चांगली आहे असे म्हणून प्रोत्साहन दिले व मी ( आदर्श वजन ७३.५ किलो ) पर्यंत नक्कीच पोहोचेन हा आत्मविश्वास दिला.
अभियानादरम्यान :
पहिल्या महिन्यात माझे वजन 3 किलो कमी झाले.
पुढील महिन्यांमध्ये अजून प्रगती झाली.
90 दिवसांनंतरचे अंतिम निकाल:
एचबीएवनसी: ५.१ → ४.९%
वजन: ९५ → ८७ किलो
कंबर: ११२ → १०० सेंमी
सर्व प्रथम मी डॉ. दीक्षित सरांचे चे खूप आभार मानतो की त्यांनी हे अभियान सुरू केले.
९० दिवसांच्या आव्हानामध्ये भाग घेतल्या पासून माझ्यात अनेक बदल घडले. उदा. वजन कमी होणे, इंचेस मधे बदल, एचबीएवनसी मध्ये फरक पडणे, उत्साह वाढणे, हे सर्व यश मिळवण्यासाठी या ग्रूप मधील एडमिन श्रीकांत डंके सर, अंजली मॅडम, बोडस सर, कीर्ती मॅडम, मेघना मॅडम याच्या मुळेच शक्य झाले. त्यामुळे मी अगदी मनापासून या सर्वांचा खूप खूप आभारी आहे.
(मराठी संकलन: डॉ रत्नाकर गोरे)


