आजची यशोगाथा : सेल्मा मॅम्पिली

0

आजची यशोगाथा : सेल्मा मॅम्पिली

परिचय पत्र

नाव: सेल्मा मॅम्पिली
वय: ६२ वर्षे
उंची: १६० सेंटीमीटर
वास्तव्य: कोट्टायम, केरळम
व्यवसाय: सेवानिवृत्त परिचारिका
समूह: Steady Stars
मोबाईल: ९२०७४५८८२६

मी दुबईमध्ये परिचारिका म्हणून काम करत होते आणि काही महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झाले. माझे एचबीएवनसी नेहमीच वाढलेले असायचे. ते प्रामुख्याने ६ ते ६.५ या दरम्यान असायचे. माझी मैत्रीण चित्रा हिच्याकडून मला डॉ. दीक्षित जीवनशैलीविषयी नेहमीच माहिती मिळत होती. परंतु कामाच्या जबाबदाऱ्या आणि व्यस्त दिनक्रमामुळे मला या जीवनशैलीचे पालन करता येत नव्हते.
सेवानिवृत्त झाल्यानंतर भारतात परत येण्यापूर्वी, ऑक्टोबर २०२५ मध्ये मी रक्ततपासणी केली. त्यावेळी माझे एचबीएवनसी ७.४% होते. अंतःस्रावतज्ज्ञांनी औषधे सुरू करण्याचा सल्ला दिला. परंतु माझी मैत्रीण चित्रा हिने मला थोडे थांबण्यास आणि फेब्रुवारी महिन्यात सुरू होणाऱ्या डॉ दीक्षित आहार जीवनशैलीच्या आव्हानात सहभागी होण्यास सांगितले.
फेब्रुवारीमध्ये डॉ. दीक्षित आहार जीवनशैलीच्या आठव्या बॅचची सुरुवात होणार असल्याचे समजल्यावर मी त्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यापूर्वी पुन्हा तपासणी केली असता माझे एचबीएवनसी ९.१% आणि फास्टिंग इन्सुलिन १५.५ होते.
मी जीवनशैलीच्या नियोजनानुसार आहाराचे पालन सुरू केले. अवघ्या एका महिन्यात माझे एचबीएवनसी ७.१% पर्यंत खाली आले. एप्रिल महिन्यापर्यंत फास्टिंग इन्सुलिन ८.८ पर्यंत आणि एचबीएवनसी ६.४% पर्यंत खाली आले.
आमचे मार्गदर्शक डॉ. दीक्षित, पद्मा मॅडम, मेघना मॅडम आणि भालचंद्र सर यांच्या सातत्यपूर्ण सहकार्याबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल मी त्यांची मनापासून आभारी आहे. जीवनशैलीचे नियमित पालन आणि नियमित व्यायाम यांमुळे माझ्या तपासणीच्या निष्कर्षांमध्ये सुधारणा होत आहे. तसेच माझ्या शरीरात अधिक ताकद जाणवत आहे.
९० दिवसांच्या शेवटी माझ्यात झालेले बदल पुढीलप्रमाणे आहेत.
एचबीएवनसी: ९.१% → ६.४%
वजन: ६४ → ५९ किलो
कंबर: ९४ → ९० सेंटीमीटर
फास्टिंग इन्सुलिन: १५.५ → ८.८
इतर सुधारणा: माझी ऊर्जा आणि उत्साह वाढला आहे. पूर्वी शरीरात मुंग्या येण्याची जी संवेदना जाणवत होती, ती आता बऱ्याच प्रमाणात कमी झाली आहे. आता मला आनंदी आणि आत्मविश्वासपूर्ण वाटते.
या प्रवासातून मला मिळालेली सर्वांत मोठी शिकवण म्हणजे खाण्याच्या अनावर इच्छेवर नियंत्रण मिळवणे, शिस्त अंगीकारणे आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणे. तसेच, इतर लोकांनाही निरोगी जीवनशैलीचा अवलंब करण्यासाठी प्रोत्साहित करण्याची प्रेरणा मिळाली.
हा उपक्रम सुरू केल्याबद्दल आणि परिणामकारक ठरलेली जीवनशैली विकसित केल्याबद्दल मी डॉ. दीक्षित यांचे मनःपूर्वक आभार मानते. या जीवनशैलीमुळे माझ्या जीवनात सकारात्मक बदल घडले आहेत. गरजू असलेल्या आणखी अनेक लोकांपर्यंत ही जीवनशैली पोहोचावी, अशी माझी मनापासून इच्छा आहे.

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts