आजची यशोगाथा : अशोक मुसळे
परिचय पत्र
नाव: अशोक मुसळे
वय: ७२ वर्षे
उंची: १६७ सेमी
वास्तव्य: अहिल्यानगर
व्यवसाय: सेवानिवृत्त
मोबाईल: ७५८८२९९१६७
मी दिनांक ३१ जानेवारी २०१० ला सेवानिवृत्त झालो. त्या दिवशी आमच्या जिल्हा परिषद मध्ये आरोग्य शिबिर होतं तिथे सहज म्हणून तपासलं. डॉक्टरांनी सांगितले की रक्तशर्करा ३७० आहे, तरी स्पेशलिस्ट कडे जाऊन परत तपासून घ्या. त्यानंतर दोन-चार महिन्यांनंतर तपासणी केली. त्यात शुगर असल्याचे सिद्ध झालं मग नियमित मधुमेह तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली फेब्रुवारी २०१८ पर्यंत औषधे घेतली. तीन-चार वर्ष शुगर कंट्रोलमध्ये होती परंतु नंतर औषधे खाऊन ही साखर वाढलेली येत होती. तेव्हा मी डॉक्टर प्रमोद त्रिपाठी यांचे व्हिडिओ पाहून त्यांनी सांगितलेली पथ्य, स्मुदी, अँटिग्रेविटी एक्सरसाइज करत राहिलो. माझ्या गोळ्या बंद झाल्या परंतु एचबीएवनसी ७-७.२% च्या आसपास राहत होती मी नोव्हेंबर डिसेंबर २०२५ पासून डॉ दीक्षित यांच्या अभियानात सामील झालो. तीन महिने या जीवनशैलीचे पालन केल्यानंतर १२ फेब्रुवारीला मी माझ्या सर्व टेस्ट पुन्हा करून घेतल्या. किडनी लिव्हर फंक्शन कोलेस्टर लिपिड प्रोफाइल सर्व नॉर्मल आले आणि एचबीएवनसी ७.२% पासून कमी होवून ५.९% झाली. आज माझं वय ७२ वर्षे असलं तरी मी तरुणासारखा सकाळी एक तास आणि संध्याकाळी एक तास एकूण १२ किलोमीटर फिरतो. त्यापूर्वी अर्धा तास जिने चढ-उतार करतो आणि हेल्दी लाईफ जगतो.
मी डॉ दीक्षित सरांचे आणि त्यांच्या टीमचे आभार मानतो. मला मधुमेह आणि रक्तदाब यासाठी या जीवनशैलीचा खूप फायदा झाला आहे. तेव्हा मधुमेहाने त्रस्त असलेल्या सर्वांनी सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे व्हिडिओ पाहून या जीवनशैलीचे अनुसरण करावे व निरोगी आयुष्य जगावे.


