आजची यशोगाथा : अनुसया लाड (२ जुलै २०२६)
परिचय पत्र
नाव: अनुसया लाड
वय: ४६ वर्षे
उंची: १६७ सेंमी
वास्तव्य: नांदेड
व्यवसाय: शिक्षिका
समूह: एक्सप्लोरर्स
मोबाईल: ९८६०८२४१४२
मला काही आरोग्यविषयक समस्या होत्या ज्यामुळे माझे दैनंदिन जीवन खूप कठीण झाले होते. वारंवार होणारे मायग्रेनचे त्रास, सतत पोट फुगणे आणि अपचन यामुळे मला जडपणा आणि अस्वस्थता जाणवत असे. दररोज लवकर थकवा येत असल्याने माझ्या दैनंदिन कामांसाठी आवश्यक ऊर्जा माझ्याकडे उरत नव्हती.
अशाच वेळी मला डॉ. दीक्षित जीवनशैली आणि ९० दिवसांच्या चॅलेंजविषयी माहिती मिळाली. सबबी देण्याऐवजी मी या चॅलेंजमध्ये सहभागी होण्याचा ठाम निर्णय घेतला. कार्यक्रमातील मार्गदर्शनानुसार आहार आणि व्यायाम यामध्ये शिस्त राखून मी प्रामाणिकपणे या जीवनशैलीचे पालन केले. या ९० दिवसांत मला जाणवलेला बदल म्हणजे माझ्या शारीरिक आरोग्याचा संपूर्ण कायापालट होता.
मधुमेह नियंत्रण: माझ्या एचबीएवनसी च्या अहवालामध्ये ५.८ वरून ५.५% पर्यंत सुधारणा झाली.
वजन आणि हलकेपणा: माझे ४.५ किलो वजन कमी झाले (७२.६ किलोवरून ६८.१ किलोपर्यंत). पोटावरील कडकपणा कमी होऊन पोट मऊ झाले आणि मला खूप हलके वाटू लागले.
पचनसंस्थेचे आरोग्य: पोट फुगणे आणि अपचनाच्या तक्रारी पूर्णपणे नाहीशा झाल्या.
रूप आणि ऊर्जा: लवकर येणारा थकवा पूर्णपणे दूर झाला, ऊर्जा पातळी लक्षणीय वाढली आणि माझ्या त्वचेवरही एक वेगळी चमक दिसू लागली.
मायग्रेनमधून दिलासा: मायग्रेनच्या झटक्यांची वारंवारता आणि तीव्रता यामध्ये लक्षणीय घट झाली.
या शारीरिक बदलांबरोबरच माझ्यामध्ये स्वअनुशासनाची सवय निर्माण झाली आणि सकारात्मक विचारसरणी विकसित झाली.
तज्ज्ञांची प्रेरणादायी व्याख्याने आणि समूहातील विविध उपक्रम यांमुळे माझा उत्साह सतत टिकून राहिला. “होय, मी हे करू शकते!” हा आत्मविश्वास त्यांनी माझ्यामध्ये कायम जागृत ठेवला.
डॉ. दीक्षित सर, मनीषा जगताप मॅडम आणि विजय शेळके सर यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि अविरत पाठिंब्यासाठी मी मनःपूर्वक आभार व्यक्त करते.
आज मी पूर्वीपेक्षा अधिक निरोगी, अधिक ऊर्जावान आणि अधिक आत्मविश्वासपूर्ण आयुष्य जगत आहे.
(मराठी अनुवाद: डॉ. रत्नाकर गोरे)


