आजची यशोगाथा : मनोज फडके
परिचय पत्र
नाव: मनोज फडके
वय: ५५ वर्षे
उंची: १६६ सेंमी
*व्यवसाय: खाजगी नोकरी *
वास्तव्य: पुणे शहर
समूह: वारियर्स
मोबाईल: ९२२५११५४३८
६ व्या आणि ७व्या आव्हानामध्ये भाग घेण्याचा माझा मुख्य उद्देश होता मधुमेह मुक्ती, जी साकार झाली नाही म्हणून आठव्या आव्हानातत भाग घेतला. एचबीएवनसी ६% च्या आत आणण्याची इच्छा होती पण थोडा कमी पडलो. पण तरीही मला जे यश मिळाले त्याचे पूर्ण श्रेय डॉ दीक्षित सर, डॉ स्वाती, विश्वास दादा, पुणे DRC, माझे सहकारी, मार्गदर्शक कविता मेहेंदळे आणि मीनल डोणगावकर यांना जाते.
मी या अभियानात सात वर्षांपूर्वी सहभागी झालो जेव्हा डॉ दीक्षित सरानी इंदिरानगर नाशिक येथे walkathon आयोजित केली होती आणि मी आयोजनात उत्स्फूर्त सक्रिय सहभाग घेतला. माझी दोन वेळा जेवणाची जीवनशैली तेव्हाच सुरू झाली मात्र चालणे आठवड्यातून एकदाच होत होते. मी गेली सात वर्षे माझ्या दिनचर्येमध्ये जेवणाच्या वेळा तंतोतंत पाळल्या. माझे सकाळी जेवण अंदाजे एक वाजता आणि रात्री नऊ वाजता असायचे. पहिल्यापासून सकाळी चालण्याची मला सवय होती, पण या आव्हानांमध्ये मनापासून भाग घेतला.
डॉ दीक्षित जीवनशैली पाळत असताना जेवणामध्ये शिस्तबद्धता आली. मग समूहाच्या सूचनेनुसार सुरुवातीला ड्रायफ्रूट्स त्यानंतर सॅलड्स त्यानंतर स्प्राऊट्स आणि त्यानंतर ज्वारी/बाजरी भाकरी व भाजी, वरण भात असा जेवणामध्ये नियमित पणा आला. अडचणी खूप आल्या पण जिद्द, डॉ मुलंमुले यांचे निर्धार कसा टीकवायचा याचे मार्गदर्शन, डॉ दीक्षित यांचे यूट्यूब व्हिडिओ खूप उपयोगी ठरले.
शिस्त पाळताना परगावी किंवा प्रवासात असताना जेवणाच्या वेळा, व्यायाम, समारंभ, सणावारामध्ये गोड न खाणे काटेकोरपणे पाळल्यामुळे फार चांगले निकाल आले. यात प्रेरणादायी गोष्ट अशी आहे की माझी मधुमेहाची औषधी १००% कमी झाली. हे मला आणि माझ्या घरच्यांना खूप समाधान देणारे आहे आणि यामध्ये अत्यंत महत्वाचे योगदान माझी सहचरिणी सौ स्नेहल यांचे. जे काही यश मिळवले ते वरील सर्वांना समर्पित करतो.
डॉक्टर दीक्षित जीवनशैली अशाच पद्धतीने पुढे चालू ठेवीन. ही जीवनशैली अंगीकारून या मधुमेह मुक्ती आणि वजन घटवण्याच्या शिबिरात अविरत सेवेकरी होऊन इतरांना प्रेरित करेन हीच सदिच्छा.
(मराठी संकलन: डॉ रत्नाकर गोरे)


