आजची यशोगाथा : मंजुषा अनगळ ( २८ जून २०२६ )

0

आजची यशोगाथा : मंजुषा अनगळ ( २८ जून २०२६ )

परिचय पत्र

नाव: मंजुषा अनगळ
वय: ६५ वर्ष
उंची: १५२ सेंमी
वास्तव्य: पुणे
व्यवसाय: गृहिणी
समूह: वॉरीअर्स
मोबाईल:   ९०११०३६२३७

मी आणि माझे पती, दोघेही या वॉरीअर्स गृपचे सभासद आहोत. जानेवारी २६ मध्ये माझी मैत्रिण रेणू उत्तेकर कडून ९० दिवसांच्या आव्हानाबद्दल समजले. २० जानेवारी या दिवशी मेघना भिडे मॅडमच्या सूचनांप्रमाणे आम्ही रात्री शेवटच्या क्षणी फॉर्म भरला.
१ फेब्रुवारी पासून आव्हानाला सुरवात झाली आणि आमच्या जीवनाला एक आरोग्यपूर्ण कलाटणी मिळाली.  जेवणाची सुरवात करताना सांगितलेले  3 पदार्थ क्रमाने खाण्याचे महत्व समजले. फेब्रुवारीच्या शेवटी जेंव्हा पुन्हा एचबीएवनसी  टेस्ट केली तेंव्हा आनंदाला पारावारच राहिला नाही कारण माझे एचबीएवनसी ६.७% वरून 6% वर आले होते. वजन २ ते अडीच किलो कमी झाले होते.
फेब्रुवारी मध्ये आव्हान सुरू झाल्यावर पुढच्याच आठवड्यात माझी तब्येत बरी नव्हती, तेंव्हा मला वॉकिंग जमत नव्हते. तेंव्हाही कविता मॅडमनी खूप दिलासा देत सांगितले की ही परिस्थितीही सुधारेल आणि  लवकरच तुम्ही व्यायाम पुन्हा सुरू कराल या त्यांच्या वाक्याने मला खूपच प्रेरणा मिळाली आणि मी पुन्हा वॉकिंग सुरू केले
मार्च महिन्याच्या शेवटी एचबीएवनसी केली तेंव्हा ५.३% आले. गेल्या १० वर्षांपासून सतत औषधे घेऊनही हे कधीच घडले नव्हते. त्यामुळे मी मेडिसिन कमी करण्यासाठी पुणे सेंटर वर यावे असे ऍडमिन  सौ कविता मेहेंदळे यांनी सांगितले. त्याप्रमाणे मी सेंटर वर गेले आणि डॉक्टर पूजा नांगरे यांनी माझी औषधे कमी केली.
एप्रिल महिन्यात औषध कमी करूनहि महिन्याच्या शेवटी जेंव्हा टेस्ट केली , तेंव्हाहि एचबीएवनसी ५.३% एवढेच टिकून राहिले होते. त्यामुळे खूप आनंद झाला आणि आत्मविश्वासही वाढला.
अशा मिळालेल्या सर्व चांगल्या परिणामांमुळे आम्ही खूप आनंदी आहोत. लवकरच माझी सर्व औषधेही बंद होतील याची खात्री आहे. आता डॉ दीक्षित जीवनशैली हीच शेवटपर्यंत आमची जीवनशैली असेल, आणि आमच्या मित्र परिवार आणि नातेवाईकांनाहि याचे महत्त्व पटवून देऊन त्यांचेही आरोग्य सुधारण्याचा नक्की प्रयत्न करू.

या यशाचे पूर्ण श्रेय अर्थातच  डॉ जगन्नाथ दीक्षित सर आणि त्यांच्या पूर्ण टीमला जाते. ज्या कळकळीने ते सगळे जण मार्गदर्शन करतात त्यासाठी त्यांना खूप खूप धन्यवाद वेळोवेळी आम्ही विचारलेल्या शंकांचे निरसन कविता मेहेंदळे मॅडम आणि मीनल डोणगावकर मॅडम यांनी त्वरित केले . डॉ दीक्षित आणि त्यांच्या कार्यतत्पर टीमचे पुनश्च एकदा मनःपूर्वक धन्यवाद.

(मराठी संकलन: डॉ रत्नाकर गोरे)

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts