आजची यशोगाथा : हितेश बालिया
परिचय पत्र
नाव: हितेश बालिया
वय: ५८ वर्षे
उंची: १७४ सेमी
वास्तव्य: मुंबई
व्यवसाय: सल्लागार
मोबाईल: ९८६९२२८६७४
डॉ. दीक्षित सरांचे व्हिडिओ पाहिल्यानंतर इन्सुलिनची भूमिका आणि कार्यपद्धती समजली. त्यानंतर रक्तातील साखरेची पातळी आणि तिचा अन्नसेवनाशी असलेला संबंध—जेवणाची वेळ, प्रमाण, प्रकार, क्रम, वारंवारता आणि कालावधी—हे सर्व अगदी स्पष्ट झाले.
यानंतर चुकीच्या खाण्याच्या सवयी सोडणे खूप सोपे झाले आणि वजनकाट्यानेही आनंददायी परिणाम दाखवायला सुरुवात केली. केवळ ४५ दिवसांत, सुमारे ९०% दिवस काटेकोरपणे नियम पाळून, तीव्र व्यायामाच्या मदतीने त्रासदायक वाढलेली कंबर कमी करण्यात यश मिळाले. मी दोन ५५ मिनिटांच्या जेवणांमध्ये ६ तासांचे अंतर ठेवले आणि त्या दोन जेवणांदरम्यान १६ तासांचा उपवासही नियमितपणे केला. मागील १४ वर्षांपासून मी योगाभ्यास आणि चालण्याचा व्यायाम नियमित करत आलो आहे, तरीही एवढ्या कमी कालावधीत झालेली सुधारणा खरोखरच उल्लेखनीय होती.
माझे मुख्य उद्दिष्ट एचबीएवनसी ची वाढती पातळी नियंत्रणात आणणे हे होते; पण त्यासोबतच LDL कोलेस्टेरॉलमध्ये २५% घट होणे हा जणू अतिरिक्त लाभच ठरला. त्यामुळे LDL कमी करण्यासाठी स्टॅटिन्स घेण्याचा दबाव आता मी सहज टाळू शकतो. माझे यकृत आणि मूत्रपिंड यांच्याही आरोग्यात सुधारणा झाली असावी, असा मला विश्वास वाटतो.
एकही गोळी न घेता किंवा कोणत्याही झटपट उपायांचा आधार न घेता इतके उत्कृष्ट परिणाम मिळाल्यानंतर, ही जीवनशैली मी आयुष्यभर पाळण्याचा निर्धार केला आहे.
गेल्या काही वर्षांपासून वाढलेल्या LDL पातळीमुळे औषधांशिवाय उपाय शोधण्याची प्रेरणा मिळाली होती. मात्र, अलीकडील तपासणी अहवालात प्रथमच एचबीएवनसी देखील वाढलेला आढळल्याने मी अधिक सतर्क झालो आणि शोध अधिक तीव्र केला.
अनेक पर्यायी पद्धतींचा अभ्यास केल्यानंतर माझा ठाम विश्वास झाला आहे की, आधुनिक जीवनशैलीजन्य आजारांपासून दूर राहण्यासाठी डॉ. दीक्षित जीवनशैलीइतकी सोपी, तर्कसंगत, वैज्ञानिक, सहज पाळता येण्यासारखी आणि परिणामकारक पद्धत दुसरी नाही.
माझे यश पाहून माझे कुटुंबीय आणि जवळचे मित्र देखील त्यांच्या क्षमतेनुसार आणि आवडीनुसार ही जीवनशैली अंगीकारू लागले आहेत.
रोगमुक्त आणि औषधमुक्त जीवनाचा संदेश जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचावा यासाठी डॉ. दीक्षित सर आणि ADORE TRUST शी संबंधित सर्व जण जे असामान्य प्रयत्न करत आहेत, त्याबद्दल मी त्यांचा मनःपूर्वक ऋणी आहे.
(मराठी अनुवाद: डॉ. रत्नाकर गोरे)


