आजची यशोगाथा : प्रतिभा गोरे

0

आजची यशोगाथा : प्रतिभा गोरे

परिचय पत्र

नाव: प्रतिभा गोरे
वय: ३६ वर्षे
उंची: १६० सेंमी
वास्तव्य: सासवड
व्यवसाय: शिक्षिका
समूह: Warriors 8th Challenge
मोबाईल:  ७५८८६८४६८५

पाच वर्षांपूर्वी माझ्या गर्भावस्थेच्या च्या ८ व्या महिन्यात मला मधुमेह असल्याचे समजले. त्यानंतर डॉक्टर म्हणाले या काळातला मधुमेह जातो, परंतु तो कायमचा राहिला. मी औषधे घेत होते. परंतु मी मधुमेहासाठी एवढी गंभीर नव्हते. मला second chance घ्यायचा होता तो मी घेतला.
पण रक्तशर्करा जास्त असल्याने डॉक्टरांनी मला abortion चा सल्ला दिला. मी त्यावेळी खूप टेन्शनमध्ये आले. डॉक्टर बोलले, तुम्हाला चान्स घ्यायचा असेल तर एचबीएवनसी ६.५% असायला हवी. त्यासाठी त्यांनी मला इन्सुलिन सुरू केले. सुरुवातीला मला काही वाटले नाही, परंतु थोड्या दिवसांनी इन्सुलिन मुळे माझे वजन वाढले, थकवा येऊ लागला. माझे वय ३५ आहे. या वयात आपण इन्सुलिन घेत आहोत हे मला पटत नव्हते. मी सतत विचार करायचे की काय करता येईल.
त्यासाठी Youtube वर डॉक्टरांच्या मुलाखती बघायचे. मला डॉ. दीक्षित सरांबद्दल माहिती होते, परंतु पूर्ण माहिती नव्हती. मी Google वरून पुणे सेंटरचा नंबर घेऊन फोन केला. त्यावेळी डॉक्टर सोमवारी आणि गुरुवारी असतात हे समजले. मी सोमवारी पुणे सेंटरला जाऊन भेटले. त्यावेळी त्यांनी मला टेस्ट करून यायला सांगितले. टेस्ट चे परिणाम सोबत घेवून मी डॉ. दीक्षित सर आणि डॉ. स्वाती मॅमला भेटले. त्यांनी सुरुवातीलाच इन्सुलिन कमी केले. त्यानंतर मी पुणे DRCC group मध्ये जॉईन झाले.
त्यानंतर 90 day challenge चे समजले. मी त्यामध्ये सहभागी होण्याचे ठरवले. सुरुवातीला एचबीएवनसी ९% होता. Challenge सुरू झाले. रोजच्या जेवणाचे फोटो पाठवणे, चालणे, Activity या सगळ्यामुळे मन प्रसन्न होत होते. सगळ्यांसोबत करताना वेगळाच आनंद वाटत होता. तसेच मनाने ठरवले होते की कोणताही सण आला तरी आपण गोड खायचे नाही. गुडीपाडवा आला, घरच्या लोकांनी पोळी खाण्याचा आग्रह केला पण नाही खाल्ली.
पहिल्या महिन्यात एचबीएवनसी ८.१% झाला. मला खूप आनंद झाला. दुसऱ्या महिन्यात आजारी पडले तरी आपल्याला लवकर बरे होऊन रोजचे फोटो पाठवायचे आहेत, चालायचे आहे हे मनाने ठरवले होते. पण या काळात कविता मेहेंदळे मॅडमनी खूप आधार दिला. ज्या ज्या वेळी काहीही वाटले की फोन करून विचारले, तरी त्या खूप समजून सांगायच्या.
दुसऱ्या महिन्यात एचबीएवनसी ८.३% झाला. तरी मी खूष होते. असेच तीन महिने कधी संपले ते समजलेच नाही. आता एचबीएवनसी ७.५% आहे.
या तीन महिन्यात सातत्याने मार्गदर्शन, प्रोत्साहन दिल्याबद्दल मी डॉ. दीक्षित सर, कविता मेहेंदळे मॅडम, मीनल डोणगावकर मॅडम यांची मनापासून आभारी आहे.

(मराठी संकलन: डॉ रत्नाकर गोरे)

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts