आजची यशोगाथा : ध्रुव साळवी ( ८ जून २०२६ )

0

आजची यशोगाथा : ध्रुव साळवी ( ८ जून २०२६ )

परिचय पत्र

नाव: ध्रुव साळवी
वय: ४१ वर्षे
उंची: १७१ सेंमी
वास्तव्य: पुणे, महाराष्ट्र
व्यवसाय: वरिष्ठ व्यवस्थापक
समूह: Warriors Group
मोबाईल: ९८२२८८४४९३

माझ्या प्रवासाची सुरुवात जानेवारी २०२६ च्या मध्यात झालेल्या नियमित वार्षिक आरोग्य तपासणीपासून झाली. त्या तपासणीचा अहवाल माझ्यासाठी मोठा धक्का देणारा ठरला. माझे एचबीएवनसी १०.६% आले होते. त्यामुळे १ फेब्रुवारी २०२६ रोजी मी माझ्या आरोग्यावर पुन्हा नियंत्रण मिळवण्यासाठी ९० दिवसांच्या चॅलेंजची सुरुवात केली.
पहिल्याच महिन्याच्या अहवालाने मला सुखद आश्चर्याचा धक्का दिला. माझे एचबीएवनसी थेट ८.०% पर्यंत खाली आले होते आणि उपाशीपोटी इन्सुलिनची पातळी २.५५ पर्यंत कमी झाली होती.
मार्च महिन्यात ही दिनचर्या माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली. या संपूर्ण प्रवासातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे कविता मेहेंदळे मॅडम यांचे मार्गदर्शन. त्या नेहमी प्रोत्साहन देणाऱ्या होत्या आणि अभिप्राय देताना कधीही कठोर नव्हत्या. त्यांच्या पाठिंब्यामुळे आम्हाला योग्य मार्गावर सातत्याने टिकून राहण्यास मोठी मदत झाली.

अंतिम महिन्यापर्यंत ही शिस्त आणि जीवनशैली पूर्णपणे अंगीकारली गेली होती. या काळात मी सर्वाधिक सातत्य राखले. आज माझ्याकडे पूर्वीपेक्षा खूप अधिक ऊर्जा आहे आणि शरीरातील वेदना व त्रासही लक्षणीयरीत्या कमी झाले आहेत. विशेष म्हणजे, शारीरिक हालचाल वाढूनही माझ्या गुडघ्यांची स्थिती पूर्वीपेक्षा अधिक चांगली झाली आहे.
आता माझे स्वप्न म्हणजे एचबीएवनसी ची पातळी ६.०% पेक्षा खाली आणणे आणि ती कायम राखणे, जेणेकरून निरोगी आणि आनंदी जीवनाचा आनंद घेता येईल.
डॉ. दीक्षित आणि कविता मेहेंदळे मॅडम यांनी दिलेल्या सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि पाठिंब्यासाठी मी त्यांचा मनःपूर्वक ऋणी आहे.

(मराठी अनुवाद: डॉ. रत्नाकर गोरे)

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts