सदस्यांना महत्वाची सूचना ( २६ एप्रिल २०२६ )
सदस्यांना महत्वाची सूचना
प्रश्न: डॉ जिचकार यांनी सांगितल्याप्रमाणे दोन जेवणांच्या मध्ये एग व्हाइट वा संत्र्याचा रस किंवा पेअर (नास्पती) घेऊ शकतो का?
उत्तर: सुरुवातीलाच स्पष्ट करतो की स्वर्गीय डॉ श्रीकांत जिचकार हे आपल्या अभियानाचे प्रेरणास्थान आहेत आणि त्यांची दूरदृष्टी तसेच त्यांचे योगदान हे आदरणीय आहे!
त्यांनी त्यांच्या व्याख्यानात जे काही सांगितले ते त्यावेळच्या उपलब्ध ज्ञानावर तसेच लॅबोरेटरी तंत्रज्ञानावर आधारित होते, हे सर्व जवळपास २० वर्षांपूर्वीचे होते. तेंव्हा इन्सुलिन टेस्ट हे अत्यंत जिकिरीचे काम होते. आम्हाला सुध्दा अभियानात सामील करण्यासाठी, या टेस्ट्स अनिवार्य करण्यासाठी, जवळपास ३ वर्षे लागली. २०१२ साली संपुर्ण महाराष्ट्रात ह्या दोन्ही टेस्ट्स करण्यासाठी ११०० ते १७०० रुपये लागायचे. आमच्या अथक प्रयत्नामुळे आता याच टेस्ट्स ५५० ते ७०० रुपयांत होतात
आमच्या गुरुवर्याना ह्या सर्व अडचणींना सामोरे जावे लागलें.
त्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी आम्हीं नव्याने तपासून पाहिल्या, त्यातून असे निष्पन्न झालें की फारच थोड्या पदार्थांमुळे इन्सुलिन स्त्रावण होत नाही आणि तेच पदार्थ आम्ही आमच्या डाएट प्लॅन संदेशातील मुद्दा क्र ३ मध्ये दिले आहेत.
नेहमीच लक्षात ठेवा, दोन जेवणांच्या मध्ये फक्त पाण्याचे सेवन हेच सर्वोत्तम आहे!
म्हणूनच, सर्व सदस्यांना माझी विनंती आहे की, संभ्रमित होऊ नका, डाएट प्लॅन मध्ये किंवा यु ट्युब वर उपलब्ध माझ्या व्हिडिओत मी सांगितल्याप्रमाणे करा
आणखी एक विनंती: दोन जेवणांच्या मध्ये आणखी काय खाता येईल याचा विचार करत वा शोध घेत न बसता, ‘दिवसात दोनदाच जेवण व मध्ये फक्त पाणी’ हे लवकरात लवकर कसे साध्य करता येईल याचा विचार करा
-डॉ जे व्ही दीक्षित
(मराठी भाषांतर : श्री अरुण नावगे)
