आजची सूचना : सॅकरीन म्हणजे काय? ( ६ मे २०२६ )

0

आजची सूचना : सॅकरीन म्हणजे काय? ( ६ मे २०२६ )


आजची सूचना

प्रश्न: सॅकरीन म्हणजे काय?

उत्तर: सॅकरीन हा रासायनिक प्रक्रियेद्वारा निर्मिलेला एक पदार्थ आहे. तो साखरेपेक्षा ४०० पट गोड आहे पण त्यात कॅलरीज नाहींत. मधुमेही त्याचा उपयोग आपण सेवन करीत असलेले अन्न गोड करण्यासाठी वापरत आलेले आहेत. सॅकरीनमुळे कॅन्सर होतो असा एक समज आहे. खरे-छोटे कांहीं का असेना, आपण तो पदार्थ टाळणेच बरे! मधुमेहींनी अगोड खाद्यपदार्थांची संवय स्वत:ला लावावी! हा एक संवय लावून घेण्याचा प्रकार आहे! जर तुम्ही अगोड चहा पिऊ लागलात तर एकाद्या आठवड्यात तुम्हाला तो आवडू लागतो.
आमच्या संशोधनात सॅकरीन वा इतर तत्सम पदार्थ सेवन केल्याने इन्शुलिनचा स्राव होत असल्याचे आढळून आल्यामुळे दोन जेवणांमधे असा चहा पिणे आमच्या आहार योजनेत बसतच नाहीं.
सॅकरीनखेरीज अॅस्परटेम, मोनेलिन व सायक्लोमेट्स सारखे इतर स्वीटनर्स आहेत. त्यांचा वापर शीतपेयांत, फळांच्या रसांत, कॅन्समधून विकल्या जाणाऱ्या पदार्थात केला जातो.
असे पदार्थ न सेवन करणे वा अत्यल्प प्रमाणात सेवन करणेच चांगले!

(मराठी अनुवाद: श्री. सुधीर काळे)

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts