आजची यशोगाथा : स्नेहल शेलार (१८ जुलै २०२६)

0

आजची यशोगाथा : स्नेहल शेलार (१८ जुलै २०२६)

परिचय पत्र

नाव: स्नेहल शेलार
वय: ३९ वर्ष
उंची: १६० सेंमी
*व्यवसाय: रेमेडियल टीचर
वास्तव्य: पुणे
समूह: Achievers
मोबाईल: ९९२२९०४७६४

मागच्या दोन वर्षांपासून तब्येतीच्या खूप समस्या वाढल्या होत्या.
प्रचंड अशक्तपणा..सतत होणारे व्हायरल इन्फेक्शन..वाढलेले वजन..पूर्वमधुमेही सुद्धा आहे…या सर्व समस्यांमुळे दैनंदिन कामे करणे सुद्धा कठीण झाले होते.
मला डॉ.दीक्षित वेटलॉस चैलेंज ची माहिती माझी मैत्रीण सौ. श्रेया राठोड हिच्या कडून मिळाली. या चैलेंज मधे सहभागी होण्याआधी मी डॉ दीक्षित जीवनशैली चे पालन नोव्हेंबर महिन्यापासूनच करत होते त्यावेळी माझे वजन हे ८९ किलो होते,फेब्रुवारी १ ला मी चैलेंज मधे सहभागी झाले त्यावेळी माझे वजन ७७ किलो होते.
या वेटलॉस चैलेंज दरम्यान मला अतिशय सकारात्मक बदल मला माझ्या तब्येतीत जाणवला आहे. मला अतिशय वेळेवर जेवण करण्याची सवय लागली, सर्वात महत्वाचे म्हणजे दोनच वेळेला खाण्याची सवय लागली. मधल्या वेळेत काहीही तोंडात टाकले जात नाही
मला सांगताना अतिशय आनंद होत आहे की नोव्हेंबर महिन्यापासून ते आतापर्यंत मी एकदाही आजारी पडले नाही आणि यात कोणतीही अतिशयोक्ती नाही. मला अतिशय उत्साही वाटते,पायाला येणाऱ्या मुंग्या पूर्णपणे बंद झाल्या आहेत वजनामुळे गुडघे दुखत असायचे तेही बंद झाले आहे.
आता तुम्हा सर्वांना वाटेल की इतक छान वाटत आहे तर मी नक्कीच मी पूर्वमधुमेही पासून मधुमेह मुक्त झाले असणार….
तर नाही….

मी अजून सुद्धा पूर्व-मधुमेही गटात आहे पण चैलेंज च्या सुरवातीला माझे वजन ७७ होते आणि आज माझे वजन ७३ किलो आहे..
सर्वांसाठी चैलेंज जरी ३ महिन्यांचे असले तरी मी नोव्हेंबर पासूनच या जीवनशैलीचे पालन अतिशय काटेकोर पणे करत आहे आणि ८९ किलो पासून चालू केलेला प्रवास ७३ किलो पर्यंत घेऊन आला आहे…मी यानंतरही थांबणार नाहीये
मी सर्वांना एवढेच सांगू इच्छिते की जरी चैलेंज च्या शेवटी आपले वजन खूप कमी नाही झाले तरी एक शिस्त आपल्या दैनंदिन आयुष्यात लागते. तुमचे प्रयत्न चालू ठेवा परिणाम नक्कीच दिसतात.
डॉ दीक्षित जीवनशैली चे पालन मी आता कायमस्वरूपी करणार आहे आणि एक दिवस मधमेहमुक्त होणार असा मला आत्मविश्वास आहे
मी डॉ. दीक्षित सरांचे मनापासून आभार मानते
श्री. डंके सर, श्री. बोडस सर आणि सौ. अंजली पाठक मॅडम यांचेही
खूप खूप आभार. तुम्ही वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे आमचा वेटलॉस चैलेंज चा प्रवास खूप छान झाला

(मराठी संकलन: डॉ रत्नाकर गोरे)

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts