आजची यशोगाथा : सलमा खान

0

आजची यशोगाथा : सलमा खान

परिचय पत्र

नाव : सलमा खान
वय: २७ वर्षे
उंची: १६३ सेंमी
व्यवसाय: स्वयंरोजगार
वास्तव्य: पुणे
समूह: पुणे पीडी ग्रुप
मोबाईल: ८१४९२७४२९२
 

मी प्रीडायबेटीस, वाढलेले वजन, सांधेदुखी अशा समस्यांनी त्रस्त होते, ज्याचा माझ्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होत होता. एका मैत्रिणीमार्फत मला डॉ. दीक्षित जीवनशैली’ आणि ‘९०-दिवसांच्या चॅलेंज’बद्दल माहिती मिळाली. जेव्हा मला समजले की हे चॅलेंज १ जूनपासून सुरू होत आहे, तेव्हा मी त्यात सहभागी होण्याचा ठाम निर्णय घेतला. माझे कुटुंब आणि मित्र थोडे साशंक होते, विशेषतः ईदसारखे सण जवळ येत असल्याने त्यांना वाटले मला हे जमणार नाही, पण मी मात्र पूर्णपणे ठाम होते. मी या कार्यक्रमात पूर्ण निष्ठेने सहभागी झाले—जेवणाचे फोटो शेअर करणे, व्यायामाचे अपडेट्स देणे आणि कार्यक्रमात शिकवलेली शिस्त पाळणे मी सुरू ठेवले.

पहिल्या महिन्यात माझे १ किलो वजन कमी झाले. त्यानंतरच्या जुलै आणि ऑगस्ट महिन्यात माझे वजन आणखी कमी झाले, रक्ताचे रिपोर्ट्स सुधारले आणि जीवनशैलीत सकारात्मक बदल झाले.
९० दिवसांच्या शेवटी:
एचबीए१सी : [६.१] → [५.८]
वजन: [१२१ किलो] → [११९ किलो]
कमर: [१४३ सेंमी] → [१२७ सेंमी]
इतर सुधारणा: ऊर्जा वाढली (उत्साही वाटू लागले)
माझ्यासाठी सर्वात मोठी उपलब्धी म्हणजे खाण्याच्या इच्छेवर नियंत्रण मिळवणे, शिस्त लावणे आणि सकारात्मक मानसिकतेची निर्मिती होणे ही होती.
मी डॉ. दीक्षित आणि श्रीकांत डांके सर यांचे त्यांच्या सततच्या मार्गदर्शनासाठी आणि समर्थनासाठी मनापासून आभार मानते. माझ्या टीममधील सदस्यांचेही खूप आभार, कारण त्यांचे जेवणाचे ताट पाहून मला माझ्या आहारात सुधारणा करण्यास मदत झाली.

(मराठी अनुवाद : श्रीनिवास बोलाबत्तीन)

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts