आजची यशोगाथा : सदानंद येवले

0

आजची यशोगाथा : सदानंद येवले

परिचय पत्र

नाव: सदानंद येवले
वय: ४० वर्षे
उंची: १६७ से. मी.
वास्तव्य: पुणे
व्यवसाय: नोकरी
समूह: DRCC Pune
मोबाईल: ९४०५७६०००१

वयाच्या एकविशीपर्यंत क्रिकेट, सायकलिंग व इतर खेळांमुळे वजन नियंत्रणात राहत असे. परंतु नोकरी निमित्ताने पुणे-मुंबई येथे यावे लागले. शहरी जीवनशैली, कर्बोदकेयुक्त आहार, नोकरी, तसेच वयपरत्वे होणारी मानसिक व भावनिक स्थित्यंतरे यामुळे वजन कधी वाढत गेले हे समजलेच नाही.
सन २०१० पर्यंत स्थिर असलेले ५७ किलो वजन २०१८ मध्ये ७३ किलो पर्यंत पोहोचले. वाढलेल्या वजनामुळे सतत थकवा, निरुत्साह, जिने चढताना दम लागणे, डाव्या पायाची टाच दुखणे ही लक्षणे दिसू लागली.
डॉ. जगन्नाथ दीक्षित सरांना एबीपी माझा वरील “माझा कट्टा “ या कार्यक्रमात ऐकले होते परंतु संपर्क कसा करायचा हे माहीत नव्हते. शेजारी व मित्र श्री. प्रफुल्ल बोरचटे यांच्यामार्फत श्री. विश्वास जोशी सरांशी संपर्क करून तातडीने एचबीएवनसी व उपाशीपोटी इन्सुलिन ह्या महत्त्वाच्या दोन रक्तचाचण्या केल्या. मग, ०३ ॲाक्टोबर २०२५ रोजी डॉ जगन्नाथ दीक्षित डायबिटीज रिव्हर्सल सेंटरला कविता मॅडम व गोखले सरांकडून डॉ दीक्षित जीवनशैलीबद्दल उपयुक्त माहिती मिळाली. मी दिनांक ४ ऑक्टोबर २०२५ पासून या जीवनशैलीचा अंगीकार केला आहे. हे साध्य करण्यामध्ये मला माझी पत्नी सौ हेमा हिचे मोलाचे सहकार्य मिळाले. जीवनशैलीत सांगितलेल्या दोनदा आहार व आहारक्रमाकडे कटाक्षाने लक्ष देत तिने मला वजन कमी करण्यास मदत केली. ही जीवनशैली अवलंबल्यानंतर माझ्यातील उत्साह हा अनेक पटीने वाढला असून मला थकवा, ऍसिडिटी, गॅस, पित्त वगैरे काही होत नाही व अत्यंत हलके वाटते. पहिल्या दीड-दोन महिन्यांमध्येच माझे सहा किलो वजन कमी झाले व आज तिथीला ते स्थिर आहे.
माझे ३ ऑक्टोबर २०२५ ते १२ जानेवारी २०२६ पर्यंतचे निकाल खालील प्रमाणे:

एचबीएवनसी: ५.३% (०३ ऑक्टोबर २०२५) → ४.९% (१२ जानेवारी २०२६)
उपाशीपोटी इन्सुलीन: ६.२४ ( ०३ ऑक्टोबर २०२५) → ८.५ % (१२ जानेवारी २०२६)
वजन: ७२.३ किलो (०३ ऑक्टोबर २०२५) → ६५.८ किलो (१२ जानेवारी २०२६)
कंबर: ९३ सेमी (०३ ऑक्टोबर २०२५) → ८४ सेमी (१२ जानेवारी २०२६)
शारीरिक फायदे: सुधारित ऊर्जा व उत्साहवर्धन, चपळता आणि टाचांचे दुखणे कमी, ॲसिडीटीपासुन मुक्ती.

मला डॉ जगन्नाथ दीक्षित सरांना त्यांच्या या महान कार्याबद्दल खूप धन्यवाद द्यावे वाटतात. विशेष म्हणजे हे सर्व कार्य ते निशुल्क पद्धतीने करत आहेत हा खरा त्या कार्याचा मोठा भाग आहे. सरांच्या या महान कार्यास अनेक शुभेच्छा.
माझ्या या वजन कमी करण्याच्या प्रवासामध्ये मला श्रीयुत विश्वास जोशी सर, गोखले सर , कविता मॅडम, उनकुले मॅडम , सामंत मॅडम व घैसास सर या सर्वांचे विशेष सहकार्य लाभले त्यांचे देखील मनःपूर्वक आभार.

(मराठी संकलन: डॉ रत्नाकर गोरे)

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts