आजची यशोगाथा : श्रेया राठोड
परिचय पत्र
नाव: श्रेया राठोड
वय: ४५ वर्षे
उंची: १४७ सेंमी
व्यवसाय: व्यावसायिक
वास्तव्य: पुणे
समूह: अचीवर्स
मोबाईल: ७७५५९०९४११
मला पूर्व मधुमेहीतून मधुमेहमुक्त व्हायचे होते व थोडेसे वजन कमी करायचे होते जेणेकरून दैनंदिन व्यावसायिक कामे विनासायास पार पडतील.
९० दिवसांचे डॉ. दीक्षित वेट लॉस व डायबेटीस रिवर्सल चॅलेंज चालू होण्याची मी वाटच बघत होते कारण अभियान ७ मधे मी भाग घेतला होता आणि मला त्याचा चांगला फायदा झाला होता. हे माझे २ रे चॅलेंज असल्याने फार काही अडचण आली नाही. आणि गुढीपाडव्याला पण मी पूर्ण गोड पदार्थ टाळले. मी पूर्ण शिस्त पाळली.
मुलाच्या ८ वी परीक्षेमुळे गुगल फॉर्म भरताना उशीर होत होता परंतु समूह संचालकांचे बारीक लक्ष असल्याने दुसऱ्या दिवशी न चुकता दैनिक गुगल फॉर्म भरला जायचा.
माझ्या जेवणाचे फोटो रोजच्या रोज शेअर केले. व त्यावर अंजली मॅडम व श्रीकांत सरांचे थंब यायचा किंवा काही कमी असेल तर लगेच सांगितले जायचे. त्यामुळे जेवणाचा क्रम व काय घ्यायचे हे बरोबर लक्षात राहिले. व्यायाम न चुकता करत होते. प्रोग्राममध्ये शिकवलेल्या सवयी १००% अंगीकारल्या व त्याचा चांगला परिणाम दिसून आला.
पहिल्या महिन्यात मला मर्यादित यश मिळाले. १.२ किलो वजन कमी झाले. पण आधीपासून जीवनशैली पालन करत असल्याने काही अडचण आली नाही.
पुढील महिन्यांमध्ये मिळून एकूण १.६ किलो वजन कमी झाले.
एचबीए१सी 0.3 ने कमी झाले. व मी मधुमेहमुक्त झाले.
ही जीवनशैली पालन करताना जे ध्येय ठेवले होते ते पूर्ण झाले.
या जीवनशैलीचे पालन असेच चालू ठेवणार आहे आणि जवळच्या लोकांना ह्याचे फायदे समजावून सांगणार आहे.
९० दिवसांनंतरचे अंतिम निकाल:
एचबीए१सी: ५.७ → ५.४%
वजन: ७१ → ६९.४ किलो
कंबर: ९७ → ९५ सेंमी
फास्टिंग इंसुलिन : ११.७ → ७.७४ यूनिट
इतर सुधारणा – जीवनशैलीचे पालन करत असल्याने एकूणच शिस्त आली.
वैयक्तिक अनुभव –खाण्याच्या वेळा पाळता यायला लागल्या. दोन जेवणाच्या मधील खाण्यावर चांगले नियंत्रण आले आहे.
या संपूर्ण प्रवासात सातत्याने मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिल्याबद्दल मी डॉ. दीक्षित आणि सर्व समूह ॲडमिन अंजली मॅडम, चिंतामणी सर व श्रीकांत डंके सर व कोअर कमिटी यांचे मनापासून आभार मानते.”
(मराठी संपादन: श्रीनिवास बोलाबत्तीन)


