आजची यशोगाथा : वैशाली कार्यकर्ते

0

आजची यशोगाथा : वैशाली कार्यकर्ते

परिचय पत्र

नाव: वैशाली कार्यकर्ते
वय: ५० वर्षे
उंची: १६१ सेमी
वास्तव्य: पुणे
व्यवसाय: आर्किटेक्ट
समूह: अचीव्हर्स
मोबाईल: ९८२३२६७१६७

मला कोणताही क्रॅश डाएट न करता वजन कमी करण्याचा कार्यक्रम हवा होता. यूट्यूबच्या माध्यमातून मला डॉ. दीक्षित जीवनशैली आणि ९० दिवसांच्या चॅलेंजची माहिती मिळाली. हे चॅलेंज १/२/२०२६ पासून सुरू होणार असल्याचे समजताच मी त्यात सहभागी होण्याचा ठाम निर्णय घेतला. मी आणि माझ्या पतीने मिळून या चॅलेंजची नोंदणी केली.
मी पूर्णपणे कटिबद्ध राहिले — जेवणाचे फोटो शेअर करणे, व्यायामाचे अपडेट्स देणे आणि कार्यक्रमात शिकवलेली शिस्त पाळणे. पहिल्या महिन्यात माझे २ किलो वजन कमी झाले आणि ऊर्जा पातळीत वाढ झाली. पुढील महिन्यांमध्ये आणखी १ किलो वजन कमी झाले.
९० दिवसांच्या शेवटी:
एचबीएवनसी: [५.४%] → [५.१%]
वजन: [८०.८ किलो] → [७७.३ किलो]
कंबर: [१००.८४ सेमी] → [९३.९८ सेमी]
फास्टिंग इन्सुलिन: [१५.७] → [६.८]
इतर सुधारणा: ऊर्जा वाढली आणि शरीराची लवचिकता अधिक चांगली झाली.
माझ्यासाठी सर्वात मोठी जाणीव म्हणजे मला खाण्याच्या इच्छांवर नियंत्रण मिळवता आले, शिस्त अंगीकारता आली आणि सकारात्मक मानसिकता विकसित झाली. सकाळी आणि संध्याकाळी साखर घातलेला दुधाचा चहा नियमितपणे पिणे मी कधी थांबवू शकेन, यावर माझाच विश्वास बसत नव्हता. पण ही सवय अवघ्या ३० दिवसांत पूर्णपणे गेली.
मी डॉ. दीक्षित आणि टीममधील सर्व सदस्यांचे मनःपूर्वक आभार मानते. त्यांनी सतत मार्गदर्शन केले, पाठिंबा दिला, व्हॉट्सअॅप ग्रुपवर आमचे नियमित निरीक्षण केले आणि वैयक्तिक संदेश पाठवून आम्हाला योग्य मार्गावर राहण्यासाठी प्रेरित केले.
आम्ही खात्री देतो की पुढेही हीच जीवनशैली कायम ठेवू. आम्ही आणखी ८ ते १० किलो वजन कमी करून उत्तम ऊर्जा पातळी प्राप्त करू.

(मराठी अनुवाद: डॉ. रत्नाकर गोरे)

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts