आजची यशोगाथा : वासुदेव परब
परिचय पत्र
नाव: वासुदेव परब
उंची: १७५ से.मी.
वय: ५८ वर्ष
वास्तव्य: वेंगुर्ला, जि.सिंधुदुर्ग
व्यवसाय: निवृत्त पोलीस उपनिरीक्षक
समूह: GUARDIANS
मोबाईल: ९१५८३६९४५०
मला वजन वाढीमुळे दैनंदिन जीवनात खूप अडचणी येत होत्या. माझे वजन १०५ किलो झाले होते. थोडं चाललं तरी दम लागायचा, सतत थकवा जाणवायचा आणि कामात लक्ष लागत नव्हतं. त्यामुळे मानसिकदृष्ट्याही खूप त्रास होत होता.
अशा वेळी मला डॉ. दीक्षित जीवनशैली आणि ९० दिवसांच्या चॅलेंजबद्दल माहिती मला श्री. प्रकाश चव्हाण यांच्या मार्फत मिळाली. सुरुवातीला थोडी शंका होती, पण स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी मी हे चॅलेंज स्वीकारले. ०१-०२-२०२६ पासून मी हा प्रवास सुरू केला. कुटुंबीयांना सुरुवातीला थोडी काळजी वाटत होती, पण मी ठाम राहिलो.
मी पूर्ण शिस्त पाळली. रोज जेवणाचे फोटो शेअर केले, नियमित चालणे आणि व्यायाम केला आणि प्रोग्राममध्ये सांगितलेल्या सवयी अंगीकारल्या. वेळेवर जेवण, साखर टाळणे आणि योग्य प्रमाणात आहार घेणे या सवयींमुळे माझ्या जीवनात सकारात्मक बदल होऊ लागले.
पहिल्याच महिन्यात मला मोठा फरक जाणवला. माझं वजन १०५ किलोवरून ९६ किलोपर्यंत कमी झालं.
पुढील महिन्यांमध्ये अजून चांगली प्रगती झाली. एप्रिलमध्ये वजन ९४ किलो आणि मे महिन्यात ९२ किलो झाले. कंबर ११२ से.मी. वरून १०१ से.मी. झाली, म्हणजे ११ से.मी.ने घट झाली.
९० दिवसांनंतरचे अंतिम निकाल:
वजन: १०५ किलो → ९२ किलो
कंबर: ११२ → १०१ सेंमी
इतर सुधारणा: शरीरात ऊर्जा वाढली, थकवा कमी झाला, आत्मविश्वास वाढला आणि दैनंदिन कामे सहज होऊ लागली.
माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी जाणीव म्हणजे शिस्त आणि सातत्य यांची ताकद. योग्य सवयी अंगीकारल्यास कोणताही बदल शक्य आहे, हे मला या चॅलेंजबद्दल कळलं.
या संपूर्ण प्रवासात सातत्याने मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिल्याबद्दल मी डॉ. दीक्षित तसेच अॅडमिन श्रीनिवास बोलाबट्टीन सर, निखिल नाफडे सर, कीर्ती लांडे मॅडम आणि त्यांचे सहकारी यांचा मनापासून आभारी आहे. हे ९० दिवसांचे चॅलेंच माझ्यासाठी फक्त वजन कमी करण्याचा प्रवास नसून, एक निरोगी आणि सकारात्मक जीवनशैलीकडे टाकलेलं महत्त्वाचं पाऊल आहे.
(मराठी संकलन: डॉ रत्नाकर गोरे)


