आजची यशोगाथा : वर्षा बिपीनचंद्र रणदिवे
परिचय पत्र
नाव: वर्षा बिपीनचंद्र रणदिवे
उंची: 157 सेमी
व्यवसाय: खाजगी नोकरी
शहर: डोंबिवली
समूह: डीएम रिव्ह २८
मोबाईल: ९७३०९५६६६५
मी डॉक्टर दिक्षीत लाईफ स्टाईल डिसेंबर २०२५ पासून करत आहे. २०१८ साली मला मधुमेह असल्याचं निदान झाले. डिसेंबर २०२५ मध्ये अचानक वजन वाढल्याचे निदर्शनास आले. मधुमेहासाठी औषधांचा स्र्टाॅंग डोस चालू होता.
मी यु ट्यूब वर डॉ. दिक्षीत सरांचे लेक्चर्स ऐकायला सुरुवात केली.जवळ जवळ ८ दिवस लेक्चर्स ऐकले. रोजच नवीन माहिती मिळु लागली व आपण स्वतःच्या आरोग्याबाबत किती हलगर्जीपणा करतो हे समजले.सरांच्या बोलण्यातून सर्व मुद्दे मनाला पटायला लागले आणि मी डॉक्टर दिक्षीत लाईफ स्टाईल करण्याचा मनाशी पक्का निर्धार केला.
डॉ दिक्षीत लाईफ स्टाईल चालू करण्यासाठी माझी आरोग्यविषयक योग्य माहिती मला देण्यास सांगण्यात आली. ह्या संबंधित टेस्ट केल्यानंतर माझे एचबीए१सी ५.६ आले. माझी मधुमेहाची गोळी बंद करण्यास सांगितले व ३ महिने औषध बंद होते.त्यामुळे माझे एचबीए१सी वाढल्याचे दिसून आले.नंतर स्र्टाॅंग गोळ्या न घेता कमी पॉवरची गोळी घेण्यास सांगितले. सांगितल्याप्रमाणे क्रमाने आहार, फक्त २ वेळेच्या जेवणाव्यतिरिक्त मध्ये काही न खाणे ह्याचे तंतोतंत पालन केले. ४ दिवस ह्या नियमांचे पालन केल्यानंतर श्री. सुनील वाघ सरांशी संपर्क साधला, त्यांनी मला त्यांच्या ग्रृप मध्ये समाविष्ट करून वेळोवेळी उत्तम मार्गदर्शन केले.
डिसेंबर २०२५ मध्ये माझे वजन ६९ किलो होते ते आज ६० किलो झाले आहे. तसेच माझ्या मधुमेहाच्या गोळ्यांचा डोस हि कमी झाला आहे. मला थायरॉईड आहे, त्याचा ही डोस कमी झाला आहे. कमी वजन व योग्य आहार घेतल्याने मला दिवसभर उत्साही वाटते. तसेच एसिडिटि चा होणारा त्रासही बंद झाला.
रोज पाऊण तास चालणे आणि नियमित व्यायाम करणे ह्याचा फायदा झाला.
या सर्व गोष्टींसाठी मी डॉक्टर दिक्षीत सर व सुनील वाघ सर यांची आभारी आहे.
संपादन: अनिरुद्ध दिवेकर


