आजची यशोगाथा : राजश्री महाजन
परिचय पत्र
नाव: राजश्री महाजन
वय: ४६ वर्षे
उंची: १६७ सेमी
व्यवसाय: गृहिणी
वास्तव्य: कल्याण जिल्हा ठाणे
समूह: DRC Thane
मोबाईल: ८४२५८४९४२०
माझ्या आयुष्यातील आरोग्यदायी परिवर्तनाची सुरुवात जागतिक महिला दिन ८ मार्च २०२६ रोजी झाली. त्या दिवशी माझे वजन ८६ किलो होते. माझ्या आरोग्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याचा निर्णय घेतला आणि माझ्या जीवनशैलीत बदल करण्यास सुरुवात केली.
०९/०५/२०२६ रोजी केलेल्या तपासण्यांचे रिपोर्ट:
• HbA1c: ६.००
• Fasting Insulin: ७.८८
त्यानंतर मी सातत्याने माझ्या lifestyle वर लक्ष दिले आणि डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या lifestyle चे पालन करण्याचा प्रयत्न केला. या lifestyle मुळे मला माझ्या आरोग्याच्या प्रवासात खूप मदत झाली. यासाठी मी मनापासून कृतज्ञ आहे.
✨ १७/०८/२०२६ रोजी केलेल्या तपासण्यांचे नवीन रिपोर्ट:
• HbA1c: ५.३
• Fasting Insulin: ९.४९
या काळात मी माझ्या जीवनशैली मध्ये सातत्य ठेवले आणि आज माझ्या या प्रवासाचा एक सुंदर टप्पा गाठला आहे.
⚖️ आजचे वजन: ७० किलो
८६ किलो → ७० किलो
म्हणजेच आतापर्यंत १६ किलो वजन कमी!
हा बदल माझ्यासाठी केवळ वजन कमी होण्यापुरता मर्यादित नाही. हा माझ्या सातत्याचा, शिस्तीचा आणि स्वतःच्या आरोग्यासाठी घेतलेल्या निर्णयाचा परिणाम आहे.
विशेषतः माझ्या HbA1c मध्ये झालेला बदल माझ्यासाठी खूप आनंददायी आणि समाधानकारक आहे.
HbA1c: ६.०० → ५.३ ✨
आज मागे वळून पाहताना मला स्वतःचा अभिमान वाटतो. ❤️
या प्रवासात मी एक गोष्ट नक्की शिकले —
“स्वतःसाठी घेतलेला एक छोटासा निर्णय, सातत्याने पाळला तर आयुष्यात मोठा बदल घडवू शकतो.”
डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या lifestyle बद्दल मनःपूर्वक आभार आणि कृतज्ञता.
डॉ. दीक्षित जीवनशैली ही मी कायम करत राहील व इतरांना देखील प्रेरित करेल!
(मराठी संकलन: डॉ. रत्नाकर गोरे)


