आजची यशोगाथा : मनोज सिंघल (८ ऑगस्ट २०२६)

0

आजची यशोगाथा : मनोज सिंघल (८ ऑगस्ट २०२६)

परिचय पत्र

नाव : मनोज सिंघल
वय: ५३ वर्षे
उंची: १५७ सेंमी
व्यवसाय: व्यापार
वास्तव्य: अलवर, राजस्थान
मोबाईल: ९८८७४५०३९६

माझे नाव मनोज सिंघल आहे, माझे वय ५३ वर्षे आहे आणि मी अलवर, राजस्थानचा रहिवासी आहे.
सहा महिन्यांपूर्वी डॉ. दीक्षित सरांचा व्हिडिओ पाहून मी डॉ. दीक्षित जीवनशैली चे पालन करण्यास सुरुवात केली होती आणि आजतागायत मी तीच फॉलो करत आहे.
मला पॉलीयुरीया म्हणजेच वारंवार लघवीचा त्रास होत होता आणि प्रायव्हेट पार्टमध्ये इन्फेक्शन झाले होते. डॉक्टरांना दाखवले तेव्हा त्यांनी शुगर चेक करायला सांगितली. जेव्हा माझी फास्टिंग शुगर ३५८ mg/dl आणि एचबीए१सी १४.१% आले, तेव्हा मी खूप घाबरलो. डॉक्टरांनी दिवसाला ८ गोळ्या लिहून दिल्या होत्या, सुरुवातीला मी त्या घ्यायचो आणि सोबतीने डाएट फॉलो करायला सुरुवात केली.
काही काळानंतर हळूहळू गोळ्या कमी झाल्या आणि डाएटमुळे शुगर नियंत्रणात येऊ लागली. पूर्वी माझ्या कमरेचा आकार ४२ इंच होता, आता तो ३५ इंच झाला आहे. सध्याच्या घडीला मी कोणतीही गोळी घेत नाही, फक्त डॉ. दीक्षित जीवनशैली चे पालन करतो. गोळ्यांशिवाय या जीवनशैलीचे पालन करताना मला २ महिने झाले आहेत. पूर्वी माझे स्नायू सैल झाले होते आणि त्वचेचा रंगही काळा पडला होता, पण आता माझ्या चेहऱ्यावर चमक आली आहे आणि स्नायू देखील ठीक झाले आहेत. तुमचे आशीर्वाद आहेतच.
सहा महिन्यांतील माझे यश खालीलप्रमाणे आहे:

६ महिन्यांपूर्वी:
• एचबीए१सी (HbA1c): १४.१%
• सरासरी शुगर: ३५८ mg/dl
• वजन: ८० किग्रॅ
३ महिन्यांनंतर:
• एचबीए१सी (HbA1c): ६.३%
• सरासरी शुगर: १३४ mg/dl
• वजन: ७६ किग्रॅ
• फास्टिंग इन्सुलिन: ४.८७ युनिट्स
• सी-पेप्टाइड: ३.०१
• इन्सुलिन रेझिस्टन्स: ०.९९८
६ महिन्यांनंतर:
• एचबीए१सी (HbA1c): ६.५%
• सरासरी शुगर: १४० mg/dl
• वजन: ६२ किग्रॅ

डॉ. दीक्षित आणि पद्मा मॅडम, तुमचे आणि तुमच्या संपूर्ण टीमचे खूप-खूप धन्यवाद. तुम्ही सर्वजण देवाचे दूत आहात.

(मराठी अनुवाद : श्रीनिवास बोलाबत्तीन)

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts