आजची यशोगाथा : पांडुरंग जोशी

0

आजची यशोगाथा : पांडुरंग जोशी

परिचय पत्र
नाव : पांडुरंग जोशी
वय: ५६ वर्षे
उंची: १८५ सेंमी
व्यवसाय: इंजिनिअर आणि कोचिंग क्लास संचालक
वास्तव्य: सांगली
ग्रुप : गार्डियन ग्रुप, ९वा चॅलेंज
मोबाईल: ९४२२७४६९५४

माझे हे दुसरे वेटलॉस चॅलेंज आहे. यापूर्वी मी आठव्या चॅलेंजमध्ये सहभाग घेतला होता. त्या चॅलेंजमध्ये मला डॉ दीक्षित जीवनशैलीच्या पालनामुळे खूप चांगले रिझल्ट्स मिळाले आणि त्या चॅलेंजमध्ये १४ किलो वजन कमी झाल्यामुळे मला प्रथम पारितोषिक मिळाले होते.
हे नववे चॅलेंज १६ जुलै ते १३ ऑक्टोबरपर्यंत नव्वद दिवस चालणार होते. या वेळीही मला गार्डियन ग्रुपमध्ये ॲड केले गेले आणि मागील चॅलेंजप्रमाणे या ग्रुपमध्येही आमचे प्रशासक श्री. श्रीनिवास सर व सह-प्रशासक सौ. स्वाती कुलकर्णी मॅडम हे होते. यांचे खूप सहकार्य लाभले. सर्वांना प्रोत्साहित करणे, प्रत्येक अडचणीत मार्गदर्शन करणे ही त्यांची खासियत आहे. आणि यामुळे प्रत्येक सहभागी आपल्या ध्येयाबद्दल अधिक जागरूक व सतर्क होतो.

या चॅलेंजमध्ये माझे वजन चार किलोने कमी झाले, माझे एचबीए१सी ०.७३% ने कमी झाले, पोटाचा घेर ४ सें.मी.ने कमी झाला आणि फास्टिंग इन्सुलिन ३.२७ वरून ३.२९ झाले.

या चॅलेंजमध्ये मला सर्वात मोठी ही उपलब्धी प्राप्त झाली की, माझ्या मधुमेहच्या गोळ्या खूप कमी झाल्या. आठव्या चॅलेंजमध्ये मला हेवी मेडिसिन्स होती, जी या चॅलेंजमध्ये हळूहळू कमी होत गेली. माझे असे मत आहे की, माझे एचबीए१सी आणखी कमी होऊ शकले असते, पण माझ्या सर्व गोळ्या कमी झाल्यामुळे ते जास्त कमी होऊ शकले नाही. आता फक्त अर्धी गोळी (kglim) सकाळी आणि संध्याकाळी सुरू आहे.

या चॅलेंजदरम्यान मी दर १५ दिवसांनी फास्टिंग आणि पीपी शुगर तपासत राहिलो, जी १०५-११५ च्या रेंजमध्ये राहिली.

इतर रिझल्ट्ससह माझी गोळी कमी झाली, याचा मला खूप आनंद आणि समाधान आहे. हे चॅलेंज पहिल्या चॅलेंजच्या तुलनेत जास्त सोपे वाटले, जणू काही आता या जीवनशैलीत जगण्याची सवयच झाली आहे आणि शुगर टेस्टशिवाय इतर कोणताही खर्च नाही.

दोन चॅलेंजच्या मधल्या काळातही माझी ही डॉ दीक्षित जीवनशैली सुरूच राहील.

आता मला दहाव्या चॅलेंजची प्रतीक्षा आहे आणि पुढील चॅलेंजमध्ये १० किलो वजन कमी करणे आणि औषधांशिवाय नॉन-डायबेटिक होणे, हे माझे ध्येय असेल.

आता मी स्वतःला खूप टवटवीत आणि आनंदी अनुभवतो. डॉ. दीक्षित सर यांनी दिलेला हा जीवनमंत्र जीवनशैली म्हणून अंगीकारण्याचा मी सतत प्रयत्न करत राहीन.

मला मिळालेल्या या यशामध्ये डॉ. दीक्षित सर, सौ. मेघना भिडे मॅडम, सौ. कीर्ती लांडे मॅडम, श्री. श्रीनिवास सर आणि सौ. स्वाती कुलकर्णी मॅडम यांचे खूप मोठे योगदान आहे. मी त्यांचे तसेच ग्रुपच्या सर्व सदस्यांचे मनापासून शतशः आभारी आहे.

मी या अभियानाची माहिती सर्व लोकांपर्यंत पोहोचवत आहे. माझ्यामध्ये आलेले सकारात्मक बदल पाहून अनेकजण प्रभावित झाले आहेत आणि तेही पुढील ९० दिवसांच्या अभियानाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

 

(मराठी संकलन: श्रीनिवास बोलाबत्तीन)

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts