आजची यशोगाथा : नवनाथ ज्ञानदेव मदने
परिचय पत्र
नाव : नवनाथ ज्ञानदेव मदने
वय: ४१ वर्षे
उंची: १६२ सेंमी
व्यवसाय: नोकरी
वास्तव्य: अहिल्यानगर
ग्रुप : गार्डियन ग्रुप, ९वा चॅलेंज
मोबाईल: ९७३०४२६८०७
मधुमेह या प्रमुख समस्येने ग्रासलो होतो आणि उंचीच्या प्रमाणात वजन थोडे जास्तीचे होते, याच कारणाने मी डॉक्टर दीक्षित जीवनशैलीचे श्री अनंत खरपाटे सरांच्या ग्रुप मध्ये सामील झालो आणि सरांच्या माध्यमातून या चॅलेंज बद्दल माहिती मिळाली, त्यांच्या प्रेरणेनेच आणि मार्गदर्शनाने चॅलेंज मध्ये भाग घेण्याचे ठरवले.
हे चॅलेंज १६ जुलै ते १३ ऑक्टोबर, या कालावधीत असणार आहे याची माहिती मिळताच, योग्य आहार, नियमित व्यायाम द्वारा हे चॅलेंज यशस्वी करायचे हा ठाम निर्धार केला.
चॅलेंज दरम्यान कामानिमित्त कर्नाटक, आंध्रप्रदेश येथे जाण्याचा योग आला २०-२५ दिवस बाहेर होतो पण मनाचा निर्धार पक्का होता आणि या काळात पण, जे नियमित जेवण आहे तेच केले. बाहेर असूनही पूर्ण शिस्त पाळली, घरी पण बरीच परीक्षा होती, सण, जेवणावळी आणि कार्यक्रम तरीही पाय घसरला नाही. रोजचे रोज दोन्ही जेवणांचे फोटो आणि व्यायामाचे स्क्रीन ग्रुप वर पाठवणे हे नित्याचे झाले होते..
आमचे ग्रुप ॲडमिन श्री श्रीनिवास सर प्रचंड ऊर्जेचा स्रोत, रोज प्रत्येक जेवणाचा फोटो प्रत्येकाचा पाहणे, व्यायामाच्या स्क्रीन पाहणे, आणि प्रत्येकासाठी प्रोत्साहन पर शब्द काढणे, त्यांच्या तोंडून येणारे शब्द वाह, मस्त, fantastic, fabulous, marvelous, great, keep it up, bullet train speed, वंदे भारत स्पीड, असे शब्द रोज आपल्यासाठी वापरले जावेत यासाठी रोज एक-दोन किलोमीटर वाढवत गेलो. सरांनी पण कौतुक करायला आणि मार्गदर्शन करायला कधीच मागे-पुढे पाहिले नाही.
आणि याचाच प्रत्यय म्हणजे पहिल्याच महिन्यात एचबीए१सी ६.३ वरून ६.१ वर आला, वजन पण ६८ वरून ६४ किलो पर्यंत आले. पोटाचा घेर पण चांगलाच कमी होत गेला..
याच कालावधीत डॉक्टरनी माझी गोळी बंद करण्यास अनुकूलता दाखवली आणि गोळी पण बंद झाली..माझी अवस्था खरच सगळी कडे आनंदी आनंद गडे अशीच होती आणि आहेपण….
चॅलेंज संपताना, 90 दिवसांनी
गोळी बंद होवूनही एचबीए१सी नियंत्रित ठेवण्यात यशस्वी झालो.. सुरवातीचा ६.३ आता ६.४
वजन- सुरवातीचे ६८ किलो आत्ताचे ५९.९३ किलो,
पोटाचा घेर- सुरवातीचा ९४ सेंमी आत्ताचे ७९ सेंमी
फास्टिंग इन्सुलिन- सुरवातीचे ४.३९ आत्ताचे २.६
बदल खूप चांगला आहे, सकारात्मक आहे. खाण्यावर खूपच नियंत्रण ठेवले, गोड खाणे तर लांबच साधी फळे पण समोर आली तरी वाढणाऱ्या इन्सुलिनची जाणीव होते, स्वतःला एका आरोग्याच्या शिस्तीत बांधून ठेवल्याचा मनस्वी आनंद होतो.
या प्रवासात श्री श्रीनिवास सर आणि स्वाती मॅडम यांचे अनमोल मार्गदर्शन लाभलं, डॉक्टर दीक्षित या अवलियाचे, किमयागाराचे, मानावे तेवढे आभार कमीच, आपण दिलेल्या या नव्या निरोगी आभाळात वावरताना, प्रचंड आनंद होतो. आपण पाहिलेल्या स्वप्नांत आम्हाला खारीचा वाटा घेता येईल याचा मनोमन आनंद होतोय. आपण पाहिलेलं स्वप्न उद्याचा मधुमेह मुक्त निरोगी भारत, नव्हे जगच असेल, नक्की असेल.
डॉ. दीक्षित जीवनशैलीच्या सर्वच सदस्यांचे आभार. वेळोवेळी केलेल्या अनमोल मार्गदर्शन कायम जपू सांभाळू, आणि खूप वाढवू हाच शब्द देताना, प्रचंड आत्मविश्वास येतो आहे.
(मराठी संपादन : श्रीनिवास बोलाबत्तीन)


