आजची यशोगाथा : दिपक शेवाळे

0

आजची यशोगाथा : दिपक शेवाळे

परिचय पत्र

नाव: दिपक शेवाळे
उंची: १७३ सेंमी
वय: ३६ वर्षे
वास्तव्य: शंकरपूर ता. गंगापूर
व्यवसाय: (शेती + जॉब)
मोबाईल: ९७६३३८२१०३

मी वजन कमी करण्याचे बरेच प्रकारचे प्रयत्न केले परंतु खूप काही यश आले नाही.
…. 5-6 महिने पूर्वी डॉ दीक्षित सरांचे व्याख्यान YouTube वर ऐकले आणि तेव्हापासून असं वाटायला लागलं की हे एक वजन कमी करण्याचे साधन नाही तर ही जीवनशैली म्हणून आपण अवलंब करू शकतो.
मग ऑक्टोबर २०२५ पासून मी हा प्रवास सुरु केला सुरवातीला मला खूप भूक लागत असे पण हळू हळू सवय पडत गेली. मी कडधान्य, भाजीपाला, फायबर, व प्रोटीन जेवणा मध्ये ॲड केले त्याने मला खूप फायदा झाला. इतर वेळेत मी जे काही खाणे, जसे शेंगदाणे बटाटे, फरसाण, मॅगी, थंड, फेंटा, सर्व बंद झाले.
सकाळ व संध्याकाळ दोन्ही वेळेस ५५ मिनिटाच्या आत जेवणे सकाळी उठल्यावर काऱ्डीओ व्यायाम ४० मिनिट व ३० मिनिट धावतो आणि रात्री जेवण झाले की १ किलोमीटर शतपावली करतो. मी रोजची १०००० पाऊले चालण्याचा नियम बनवून घेतला आहे.

मला वजन व शुगर मधे खूप फरक दिसु लागला. मला दैनंदिन कामात मला उत्साह वाढला आहे. तसेच वजन कमी झाले व साखर ही कमी झाली. सर्व मला विचारतात की वजन कमी करण्यासाठी तुम्ही काय करता तेव्हा मी गर्वाने मी सांगतो की मी डॉ दीक्षित जीवनशैली अवलंबली आहे. तुम्ही पण अवलंबा आणि इतरांना ही युट्यूब वरील व्हिडिओ बघण्यास सांगा.

मी डॉ दीक्षित आणि त्यांचे सहकारी सुनील सर यांचे मनापासून धन्यवाद देतो.

(मराठी संकलन: डॉ रत्नाकर गोरे)

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts