आजची यशोगाथा : जयश्री धनवडे

0

आजची यशोगाथा : जयश्री धनवडे

परिचय पत्र

नाव:  जयश्री धनवडे
वय: ४८ वर्षे
उंची: १५८ सेंमी
व्यवसाय: गृहिणी
वास्तव्य: नांदेड
समूह: गार्डियन्स ग्रुप
मोबाईल: ७४२०९४२२३०
 

मला सन २०२२-२३ मध्ये मधुमेह (डायबिटीस) हा आजार असल्याचे निदान झाले. बी.पी.चाही त्रास सुरू झाला. सातत्याने औषधे सुरू होती, परंतु त्याच वर्षी अचानक मला सहा महिन्यांच्या अंतराने पॅरालिसिसचा अटॅक आला. त्यामुळे माझे वजनही खूप वाढले.
सन २०२५ मध्ये मी यूट्यूबवरील विविध व्हिडिओ पाहून एप्रिल २०२५ पासून डायट सुरू केले. त्याच दरम्यान मला “7th Weight Loss Challenge” बद्दल माहिती मिळाली आणि मी त्यात सहभाग घेतला. या चॅलेंजमुळे मला खूप फायदा झाला.
त्यानंतर मार्च २०२६ मध्ये “8th Weight Loss Challenge” मध्येही मी सहभाग घेतला. या चॅलेंजदरम्यान मी ठरवले की, आपण आता मधुमेह-मुक्त व्हायचे. त्या तीन महिन्यांत मी पूर्ण शिस्त पाळली आणि रोज सुमारे ४.५ किलोमीटर चालण्यास सुरुवात केली.
पहिल्या महिन्यात मला काही विशेष फरक जाणवला नाही. उलट ६.५ किलो वजन वाढल्यामुळे माझे एचबीएवनसी ६.९% झाले. परंतु तिसऱ्या महिन्यात मला वजनात स्पष्ट फरक जाणवू लागला. माझे एचबीएवनसी ६.६ वरून ६% झाले आणि मी मधुमेही वरून पूर्व-मधुमेही अवस्थेत आले.
यासाठी मी डॉ दीक्षित, एडमिन श्रीनिवास सर आणि निखिल सर यांची मनःपूर्वक आभारी आहे. त्यांचे खूप खूप धन्यवाद.

(मराठी संकलन: डॉ रत्नाकर गोरे)

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts