आजची यशोगाथा : अर्चना घोडनदीकर

0

आजची यशोगाथा : अर्चना घोडनदीकर

परिचय पत्र

नाव: अर्चना घोडनदीकर
वय: ३९ वर्षे
ऊंची: १५८ सेमी
वास्तव्य: पुणे
व्यवसाय: नोकरी
समूह: वॉरिअर्स
*मोबाईल : ७३५०९८८७९९

साधारणपणे मागील वर्षी मला सतत युरिन इन्फेक्शन व्हायला लागले. नेमके कारण कळत नव्हते. माझ्या एका मैत्रिणीने मला ब्लड टेस्ट करून घ्यायला सांगितले. टेस्टमध्ये माझे एचबीएवनसी ९.८% आले आणि मला खूप मोठा धक्का बसला. मी खूप घाबरले, रडले. अनेकांनी सांगितले की आता मधुमेहाच्या गोळ्या सुरू कराव्या लागतील आणि खूप पथ्य पाळावी लागतील. त्या वेळी मला खूप निराश वाटत होते.
पण म्हणतात ना, देव कुठल्या ना कुठल्या रूपात भेटतो. मला तो डॉ. जगन्नाथ दीक्षित सरांच्या रूपात भेटला. मी JM रोडवरील सेंटरमध्ये गेले. तिथे कविता मेहेंदळे मॅडम भेटल्या. माझे समुपदेशन झाले आणि डॉ दीक्षित सरांनी मला खूप आत्मविश्वास दिला. त्यांनी सांगितले, “घाबरायचे कारण नाही. ही जीवनशैली १००% पाळा आणि दर महिन्याला एचबीएवनसी तपासून दाखवा.”
सेंटरच्या गटातून मला ९० दिवसांच्या आव्हानाबद्दल समजले आणि मी त्यात सहभागी झाले. कविता मेहेंदळे मॅडम आमच्या गटाच्या अॅडमिन होत्या. नियमित व्यायाम आणि दिवसातून फक्त २ वेळा जेवण करण्याची मला सवय लागली. अधूनमधून कविता मॅडमशी फोनवर बोलणे व्हायचे. त्या कधीही न थकता माझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर द्यायच्या.
हळूहळू मला स्वतःमध्ये बदल जाणवू लागले. वजन कमी होऊ लागले, थायरॉईड कमी झाले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझा एचबीएवनसी कमी होऊ लागला. फेब्रुवारीमध्ये तो ८.१ वरून ७.८ झाला आणि मार्चमध्ये ७.३% पर्यंत आला. माझ्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली मला विश्वास वाटू लागला की मी मधुमेहमुक्त होऊ शकते.
एकही मधुमेहाची गोळी न घेता एचबीएवनसी कमी करण्याचे गमक मला डॉ. दीक्षित सर आणि वॉरिअर्स गटातील अॅडमिन कविता मेहेंदळे मॅम व मीनल डोणगावकर मॅम यांच्यामुळे समजले.
त्यांना मनःपूर्वक धन्यवाद
आज त्यांच्या पाठिंब्यामुळे मी निरोगी आयुष्य जगण्यासाठी सक्षम होत आहे.

(मराठी संकलन: डॉ रत्नाकर गोरे)

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts