आजची यशोगाथा : अनिल मडके ( २० एप्रिल २०२६ )

0

आजची यशोगाथा : अनिल मडके ( २० एप्रिल २०२६ )

परिचय पत्र

नाव: अनिल मडके
उंची: १६९ सेंमी
वय: ४५ वर्षे
वास्तव्य: वाशिम
व्यवसाय: शिक्षक
समूह: RMI DYDN Group
मोबाईल: ९१५८६३१६३४

मला मधुमेह, वजन वाढ, इ. या समस्यांमुळे दैनंदिन जीवनात खूप अडचणी येत होत्या. मला दिनांक १५ फेब्रुवारी २०२४ ला मधुमेहाचे निदान झाले व दिनांक एक मार्च २०२४ पासून मी डॉ. दीक्षित लाईफस्टाईल सुरू केले. परंतु मला मनासारखे यश मिळाले नाही. मात्र मी सुरवातीपासून औषधी घेतली नाही. मला ९० दिवसांचे चॅलेंज बद्दल माहिती मिळाली [स्त्रोत: यूट्यूब ]. हे चॅलेंज १ जून पासून सुरू होणार असल्याचे कळल्यावर मी ठाम निर्णय घेतला. कुटुंबीय आणि मित्रांना खात्री होती, कारण मी एक वर्षांपूर्वीपासूनच डॉ. दीक्षित जीवनशैलीची सुरुवात केली होती. त्यामुळे मी पूर्णमनाने हे चॅलेंज करण्याचे ठरवले.
मी पूर्णशिस्त पाळली: जेवणाचे फोटो शेअर केले, व्यायाम आणि इतर क्रियाकलाप अपडेट केले, प्रोग्राममध्ये शिकवलेल्या सवयी अंगीकारल्या. पहिल्या महिन्यात मला [प्रथम यश – उदा. वजन कमी, साखरेचे प्रमाण कमी, इ.] असा बदल दिसला. पुढील महिन्यांमध्ये अजून प्रगती झाली जसे की [पुढील वजन कमी, चांगले ब्लड रिपोर्ट्स, जीवनशैलीत बदल इ.].
९० दिवसांनंतरचे अंतिम निकाल:
एचबीएवनसी : [७.२३] → [६.००]
वजन: [७५] → (७३]
कंबर: [१०५] → [९५]

इतर सुधारणा: उर्जा वाढली, वेदना कमी झाल्या इ.]
माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी जाणीव म्हणजे: [वैयक्तिक अनुभव – उदा. खाण्याच्या लालसेवर पूर्णपणे नियंत्रण, शिस्त अंगीकारणे, मनोवृत्ती सुधारली इ.]. डॉ दीक्षित साहेबांचे युट्युब वरील अनेक व्हिडिओ मी पाहिले. त्या सर्व व्हिडिओमधून साहेबांची मांडणी तसेच त्यांचा निस्वार्थभाव व मधुमेही रुग्णांबद्दलची तळमळ मला जाणवली. मी हे सर्वबघून प्रेरित झालो व तेव्हाच निश्चय केला की, आपण मधुमेहावर डॉ दीक्षित जीवनशैली नुसार विजय मिळवायचा. अडोर ट्रस्टच्या माध्यमातून ही सर्वमंडळी जे कार्यकरत आहे ते कार्यशब्दांच्या पलीकडे आहे. ही एक महान सेवा आपण करत आहात.
डॉ. दीक्षित जीवनशैली मुळे नुसते मधुमेहावर किंवा वजन वाढीवर विजय मिळवता येत नाही, तर त्यामुळे एक सकारात्मक ऊर्जा शरीरात व मनात संचारते. आत्मविश्वास वाढतो व त्यामुळे जीवनाकडे बघण्याचा सुंदर दृष्टिकोन तयार होतो. माझे जेव्हा सुरुवातीला मधुमेहाचे निदान झाले व डॉक्टरने मला प्रिस्क्रिप्शन दिले तेव्हा मी त्यांचा सल्ला ऐकला व मी त्यांना सांगितले की मला औषधी घ्यायची नाही. मी डॉ. दीक्षित जीवनशैलीनुसार मधुमेह नियंत्रणात आणणार आहे. त्यांनी मला ही जोखीम न घेण्याचे सुचविले. परंतु जेव्हा तीन महिन्यानंतर मी परत त्यांना भेटलो तेव्हा त्यांनी सुद्धा आश्चर्य व्यक्त केले व कौतुकही केले.
या संपूर्ण प्रवासात सातत्याने मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिल्याबद्दल मी डॉ. दीक्षित साहेब, पद्मा बी आर मॅडम, अनिरुद्ध दिवेकर, भालचंद्र बेलूर व मेघना भिडे मॅडम यांचा मनापासून आभारी आहे.

(मराठी पुनर्लेखन: डॉ रत्नाकर गोरे)

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts