आजची टीप : आहार योजनेबद्दलचे दोन गैरसमज दूर झाले
नवीन लोकांना डाएट प्लॅन विषयी काही शंका आहेत असे आमच्या लक्षात आले आहे .
१. काही जणांनी ५५ मिनिटांत खाणे याचा अर्थ ५५ मिनिटं खात राहणे असा घेतला आहे .साहजिकच त्यांना ते अवघड जाते आहे .
२ . काही जणांना वाटते की वजन कमी करायचे म्हणजे कमी खायचे.
स्पष्टीकरण
१. आपल्या डाएट प्लॅन मध्ये आपले जेवण जास्तीत जास्त ५५ मिनीटांत पूर्ण करा असे सांगितले आहे .तुम्ही ते १५-२० मिनीटात किंवा ५५ मिनिटांच्या पेक्षा कितीही कमी वेळात संपवू शकता . या डाएट प्लॅन मध्ये आपल्याला इन्सुलिन सिक्रीशनची वारंवारिता कमी करायची असते . तुम्ही खाण्याला सुरुवात केली की लगेच इन्सुलिनचे स्रवणे सुरु होते .
५५ मिनिटांच्या पेक्षा जास्त वेळ खाणे सुरु राहिले तर इन्सुलिन दुसऱ्यांदा सिक्रीट होते ,जे आपल्याला टाळायचे आहे .म्हणूनच ही ५५ मिनिटांची मर्यादा .
२. या डाएट प्लॅनमध्ये तुमच्या खाण्याच्या प्रमाणावर किंवा खाद्यपदार्थांच्या विविधतेवर कोणतेही बंधन नाही . तुम्ही आधी जे खात होता ते सर्व खाऊ शकता .म्हणून व्हिटॅमिन /खनिजांच्या कमतरतेचा प्रश्नच उद्भवत नाही .
तुमच्या शंकेचे समाधानकारक निरसन झाले असावे अशी आशा करतो .
–डॉ .जगन्नाथ दीक्षित

