आजचा प्रश्न : अंड्यात कोलेस्टेरॉल असल्याने ते खाऊ नये हे खरे आहे का? ( २४ मे २०२६ )
आजचा प्रश्न
प्रश्न: अंड्यात कोलेस्टेरॉल असल्याने ते खाऊ नये हे खरे आहे का?
उत्तर: एक लक्षात घ्या की वनस्पति पदार्थांमध्ये कोलेस्टेरॉल नसते .
पूर्णपणे शाकाहारी असणाऱ्या व्यक्तींच्या रक्तात मग कोलेस्टेरॉल कसे काय असते ? याचे कारण म्हणजे मेदपदार्थाचे पचन झाल्यानंतर शरीरात कोलेस्टेरॉल तयार होते.
त्यामुळेच अंड्यातील कोलेस्टेरॉल पोटात गेल्यानंतर पचनाच्या प्रक्रियेत त्याचे विघटन होते, पण ते कोलेस्टेरॉलच्या स्वरूपात रक्तात शोषले जात नाही.
त्यामुळेच आहारातील कोलेस्टेरॉल व रक्तातील कोलेस्टेरॉल याचा संबंध लावणे योग्य ठरणार नाही व त्यामुळेच अंड्यातील कोलेस्टेरॉलचा फारसा बाऊ करण्यातही अर्थ नाही.
