यशोगाथा 15: तारीख: 11 मार्च 2022
परिचय पत्र
नाव: सुनिला राणे
वय: ६३ वर्ष
उंची: १६० सेंमी
वास्तव्य: पुणे
व्यवसाय: गृहिणी
समूह: DM – 01
मोबाईल: ८८०६६६१८८२
माझी परिवर्तन कथा
मला ११ नोव्हेंबर २०२१ला मधुमेही असल्याचे कळले . डॉक्टरांनी मला दिवसातून दोन वेळा ५०० मिग्रा. च्या गोळ्या घेण्यास सांगितले परंतु मला गोळ्या घ्यायच्या नव्हत्या. मी मधुमेह मुक्ति बद्दल डॉक्टर दीक्षितांचे यूट्यूबवर लेक्चर ऐकले होते. त्यामुळे आता मी त्यांची सर्व भाषणे पुन्हा ऐकली. त्यात मला डॉ. नंदकुमार सरांचा नंबर मिळाला त्यावर संपर्क केला. सरांनी मला डाएट बद्दल माहिती देवून ग्रुपमध्ये घेतले.
मी सकाळी ११ वाजता व संध्याकाळी ८ वाजता जेवण करते. मी जेवणात ३ अक्रोड ५ बदाम ५ पिस्ते , सलाड २ अंडी आणि कडधान्य, पालेभाज्या, आणि मग भाकरी, घावण, डोसा(ज्वारी, नाचणी) खाते. मधल्या वेळेत पाणी, ताक आणि कोरा चहा घेते. मी रोज सकाळी ४५-५० मिनिटात ५ किमी पायी चालण्याचा व्यायाम करते तसेच प्राणायाम आणि इतर योगासने सुद्धा करते. यामुळे मला खूपच फरक जाणवला. माझा उत्साह व कामाची गती वाढली. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे माझी थायरॉईडची गोळी निम्म्यावर आली.
डॉ दीक्षित* जीवनशैलीचे तीन महिने पालन केल्यावर मी गंभीर मधुमेही पासून मधुमेह–मुक्त झाले . माझ्यासाठी हा चमत्कारच आहे असे मी मानते. याचे सर्व श्रेय *डॉ दीक्षित* सरांना जाते त्यांची मी खूप आभारी आहे . त्यांच्याकडून सर्वांना असेच छान मार्गदर्शन मिळत राहो ही सदिच्छा. मी डॉक्टर नंदकुमार सरांनाही धन्यवाद देते.