आजची यशोगाथा : विनया खवणेकर

0

आजची यशोगाथा : विनया खवणेकर

परिचय पत्र
नाव: विनया खवणेकर
वय: ६३ वर्षे
उंची: १६२ सेंटीमीटर
व्यवसाय: निवृत्त
वास्तव्य: मुंबई
समूह: चॅम्पियन
मोबाईल: ९९७५७८९४८८

मी प्री-डायबेटिक होते. सतत बदलणारे एचबीएवनसी चे प्रमाण, अंगावर येणारे काळे डाग आणि हलकी पोटदुखी यांमुळे माझा मानसिक तणाव खूप वाढला होता. नेमके काय करावे हेच सुचत नव्हते. सुरुवातीला मी स्वतःहून तीन महिने गोड खाणे पूर्णपणे बंद केले आणि एकादशीचे कडक उपवास केले. त्यामुळे माझे एचबीएवनसी ५.६% पर्यंत खाली आले. मात्र, नंतर पुन्हा गोड खाण्यास सुरुवात झाल्याने ऑक्टोबर २०२४ मध्ये एचबीएवनसी ६.०% वर आणि ऑक्टोबर २०२५ मध्ये ६.२% वर जाऊन पोहोचले.
यावर उपाय शोधण्यासाठी मी यूट्यूबवर माहिती पाहिली असता मला डॉ दीक्षित जीवनशैली बद्दल समजले. ही पद्धत मला नक्कीच जमेल असा विश्वास वाटल्याने मी त्याचे पालन सुरू केले. घरी असताना नियम पाळले जायचे, पण बाहेर गेल्यावर दिवसातून ३-४ वेळा खाणे व्हायचे. माझ्या प्रयत्नांत सातत्य नव्हते, तरीही माझे एचबीएवनसी ५.७% पर्यंत आले.
पुढे यूट्यूबच्या माध्यमातूनच मला ९ व्या चॅलेंजची माहिती मिळाली. ही जीवनशैली शास्त्रोक्त पद्धतीने समजावी या उद्देशाने मी हे चॅलेंज जॉईन केले. सुरुवातीला मला वाटले की येथे फक्त जेवणाच्या वेळा आणि आहार याबद्दलच मार्गदर्शन मिळेल; पण यासोबतच रोज किमान ४.५ किलोमीटर चालणे आवश्यक असल्याचे समजले. सुरुवातीला चालण्याचा खूप कंटाळा यायचा, पण तीन महिने हा प्रयोग प्रामाणिकपणे करून पाहायचाच असा मी निश्चय केला. हळूहळू चालण्याचा कंटाळा दूर झाला. आता मी दररोज ५ ते ६ किलोमीटर अंतर कोणताही थकवा न जाणवता आरामात चालू शकते. विशेष म्हणजे, जून महिन्यात सुरू झालेली माझी टाचदुखीदेखील मी न थांबता चालत राहिल्यामुळे पूर्णपणे बरी झाली.
दर रविवारी होणारी व्याख्याने अत्यंत माहितीपूर्ण असायची. त्यातून मला जेवणातील पदार्थांचा योग्य क्रम आणि त्यामागचे शास्त्रीय कारण समजले. पूजा मॅडम नेहमी ताटातील पदार्थांबाबत मोलाच्या सूचना द्यायच्या, तर सागर सर चालण्याविषयी सतत प्रोत्साहन द्यायचे. तसेच, ग्रुपमधील इतर सदस्यांची प्रगती पाहून मलाही अधिक जोमाने प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळायची.
या चॅलेंजमुळे माझ्या आरोग्यात झालेले सकारात्मक बदल खालीलप्रमाणे आहेत:
* एचबीएवनसी: ५.७ वरून ५.४% वर आले.
* फास्टिंग इन्सुलिन: ४.६६ वरून २.५९ पर्यंत कमी झाले.
* वजन: ५१.६ किलोवरून ४६.५ किलो झाले.
* कमरेचा घेर: ९० सेंटीमीटरवरून ८६ सेंटीमीटर झाला.
माझ्या आरोग्यात हा अमूलाग्र बदल घडवून आणल्याबद्दल डॉ. दीक्षित सर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मनापासून खूप खूप धन्यवाद!

(मराठी संकलन : रविंद्र ढवळीकर)

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts