आजची यशोगाथा : प्राजक्ता दुसाने (४ नोव्हेंबर २०२६)
परिचय पत्र
नाव: प्राजक्ता दुसाने
उंची: १५२ सेमी
वय: ४३ वर्षे
वास्तव्य: वडोदरा
व्यवसाय: गृहिणी
समूह: लीडर्स, ९ वे आव्हान
मोबाईल: ९८९२४५२४८९
मला वजन वाढीमुळे दैनंदिन जीवनात खूप अडचणी येत होत्या. मी बरेच प्रयत्न केले पण माझ्यात काहीही फरक दिसून येत नव्हता. यातच माझा वेळेसोबत पैसा ही गेला. नंतर मात्र मला डॉ. दीक्षित जीवनशैली आणि ९० दिवसांचे चॅलेंज बद्दल माहिती मिळाली [स्त्रोत: यूट्यूब] द्वारे. ही जीवनशैली सुरूवातीला माझ्या मिस्टरांनी सुरू केली. ते ८व्या चैलेंज मध्ये सहभागी होते. त्यात त्यांना खूप फायदा झाला ते डायबेटिक वरून नाॅन डायबेटिक वर आले… आणि त्यांच्या १७ वर्षापासून ज्या मेडिसीन चालू होत्या त्या पुर्णपणे बंद झाल्या.
खरतर जेव्हा मी ह्या चैलेंज मध्ये भाग घेत होते तेव्हा आमचे इतर कुटुंबीय आणि मित्रांना खात्री नव्हती, विशेषतः श्रावण महिना, गणपती, नवरात्र यांसारख्या सणांमुळे हे लाईफस्टाईल मी फाॅलो करु शकणार नाही असे वाटत होते पण मी पूर्ण मनाने हे चॅलेंज करण्याचे ठरवले. गणपतीत काही २/३ दिवस अडचणी आल्या पण इतर दिवस मी यानुसार च सर्व पाळायचा प्रयत्न केला. रोज माझे जेवणाचे फोटो शेअर केले. व्यायाम/क्रियाकलाप अपडेट केले. काही अडचण आल्यास मनिषा मॅम आणि कविता मॅम दोघांनी मार्गदर्शन दिले. त्यांच्या मुळे मी ही जीवनशैली खूप उत्साहाने तसेच आनंदाने पुर्ण करु शकले.
याचबरोबर माझ्या रोजच्या जीवनशैलीत पण खुप सकारात्मक बदल झाले आहे. आम्ही घरात सर्वच आता ह्या जीवनशैली नुसार आमचा रोजचा आहार व व्यायाम करतो. यामुळे घरात सतत खेळिमेळीचे वातावरण असते. दररोज एका नवीन उत्साहात आमची दिनचर्या सुरू होते.
खुप खुप धन्यवाद कविता मॅम आणि मनिषा मॅम, तूमच्या मार्गदर्शनाखाली मला ही लाईफस्टाईल आत्मसात करता आली, ह्या डॉ. दीक्षित जीवनशैली बद्दल फार पूर्वीपासून माहीत होते पण ते योग्य रितीने कसे फाॅलो करता येईल हे मला कळाले . काय खावे, कसे खावे, किती खावे याबद्दल तुम्ही सतत मला मार्गदर्शन करत आले. तुमच्या या सततच्या मार्गदर्शनामुळे माझ्यातही एक वेगळा उत्साह निर्माण झाला. माझे वजन तर कमी झालेच पण त्यासोबतच माझा सर्व प्रकारच्या कामाचा उत्साह पण वाढला.
पहिल्या महिन्यात माझे ३ किलो वजन कमी झाले. गोड खाद्यपदार्थ खाणे ही बंद झाले
पुढील महिन्यांमध्ये अजून प्रगती झाली जसे की २ किलो वजन कमी झाले तसेच माझ्या चालण्याचा वेगही वाढला आणि मुख्य म्हणजे सकाळी लवकर उठून चालण्याची सवय लागली. दुसरा महिन्यात माझा इंचलाॅस ही दिसुन आला माझ्या पोटाचा घेर ७ सेमी ( १०७ वरुन १०० वर ) ने कमी झाला.
तिसऱ्या म्हणजे चैलेंज च्या शेवटच्या महिन्यात अजून २ किलो वजन कमी झाले आणि पोटाचा घेर ही आता ९६ सेमी दाखवत आहे
मी तर खूपच खुश झाले. यापुढे पण मी नित्यनेमाने ही जीवनशैली चालू ठेवेन आणि माझ्या घराला नेहमीच सुद्रृढ आणि निरोगी ठेवण्यास प्रयत्न करत राहिन.
९० दिवसांनंतरचे अंतिम निकाल सोबत दिलेल्या चार्ट मधे दिलेले आहेत:
इतर सुधारणा: [उर्जा वाढली, वेदना कमी झाल्या, आळस गेला इ.]
माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी जाणीव म्हणजे:
[माझ्या खाण्याच्या लालसेवर नियंत्रण मिळवले, शिस्त अंगीकारली, मनोवृत्ती सुधारली. घरात माझ्या मुलांनाही चांगले पदार्थ खाण्याच्या सवयी लावल्या.]
या संपूर्ण प्रवासात सातत्याने मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिल्याबद्दल मी डॉ. दीक्षित सर आणि आमचे गृप ॲडमीन मनिषा मॅम आणि कविता मॅम यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते.
(मराठी संपादन आणि पुनर्लेखन: अनिरुद्ध दिवेकर)


