आजची यशोगाथा : शरण उमाकांत सलगरे (२८ऑक्टोबर २०२६)

0

आजची यशोगाथा : शरण उमाकांत सलगरे (२८ऑक्टोबर २०२६)

परिचय पत्र

नाव : शरण उमाकांत सलगरे
वय: ५१ वर्षे
उंची: १८० सेंमी
व्यवसाय: कृषी व अती अत्यावश्यक खाद्य पदार्थ आयात निर्यात
वास्तव्य: सांगोला जि. सोलापूर
ग्रुप : गार्डियन ग्रुप, ९वा चॅलेंज
मोबाईल: ९३७३००३९७०

मला डॉ. दीक्षित जीवनशैली ची माहिती २०१९ च्या ऑक्टोबर महिन्यात झाली. माझ्या गालावर खाजवत होते म्हणून पंढरपूर येथील त्वचारोग तज्ञ डॉ मेनकुदळे यांच्याकडे गेलो असता त्यांनी मला रक्तातील साखर तपासण्यासाठी सांगितले, ती १६० एवढी आढळून आली. डॉक्टरांनी त्यांच्या प्रिस्क्रिप्शन पॅड वर गोळ्या अथवा औषध लिहून न देता Rx. Dr. Jaggnath Dixit (You Tube) असे लिहून दिले, मी ते पाहताच आवाक् झालो.
त्याकडे दुर्लक्ष करून नेहमी प्रमाणे जीवनशैली सुरू ठेवली. दरम्यान डॉ. दीक्षित सरांचे यूट्यूब वरील व्याख्यान पाहत होतो. माझ्या जीवनात २५ डिसेंबर २०२५ रोजी एक घटना घडली. त्या दिवशी माझ्या वडिलांचे मधुमेहाने निधन झाल्यावर माझे डोळे खाडकन उघडले, त्या नंतर मी डॉ. दीक्षित जीवन शैली खऱ्या अर्थाने अवलंबण्यास सुरू केली पण त्यात प्रवास या कारणाने सातत्य राहत नव्हते. नंतर तळपायाची आग वाढली, डोळे दुखायला सुरू झाल्यावर मी याच्याकडे गांभिर्याने बघायला सुरू केले. त्यातच डीआरसीसी ग्रुप द्वारा डॉ दीक्षित ९० दिवसांचे चॅलेंज बद्दल माहिती मिळाली. १६ जुलै २०२६ ते १३ ऑक्टोबर २०२६ ह्या दरम्यान हे चॅलेंज सुरू होणार असल्याचे कळल्यावर मी ठाम निर्णय घेतला. या दरम्यान माझी पत्नी सौ. वैशाली हिने मला प्रोत्साहन दिले आणि माझा आत्मविश्वास वाढवला व ठाम पणाने माझ्या मागे उभी राहिली.

या काळात महत्त्वाचे सण समारंभ जास्त नव्हते त्यामुळे जास्त अडचणी आल्या नाहीत.ज्या अडचणी होत्या त्या प्रवासाच्या दरम्यानच्या जसे ४५ मिनिट चालणे अथवा धावणे, खाण्याच्या वेळा पाळणे, त्या वेळी अपेक्षित न मिळणारा आहार. मी पूर्ण शिस्त पाळण्याचा प्रयत्न केला. व्यायाम जवळपास ९०% यशस्वी पणाने केला त्यामुळे एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण झाला तसेच प्रोग्राममध्ये शिकवलेल्या सवयी अंगीकारण्याचा प्रयत्न केला.

पहिल्या महिन्यात वजनात जास्त काही फरक नाही पडला. कंबरेचा घेर जरा कमी झाला तसेच साखरेचे प्रमाण कमी झाले आणि औषधे पण कमी झाली.
पुढील महिन्यांमध्ये अजून चांगली व उल्लेखनीय प्रगती झाली.
९० दिवसांनंतरचे अंतिम निकाल:
एचबीए१सी सुरवातीचे १४.१% शेवटीचे ७.७
वजन: सुरुवातीचे : ८० किलो, शेवटचे पण ८० किलो
कंबर: सुरुवातीची १०० सेंमी आणि शेवटची ९० सेंमी
फास्टिंग इंसुलिन :सुरुवातीची ५.६१, शेवटची ४.११

इतर सुधारणा- मनाला चांगले वळण लागले तसेच औषधे कमी झाली. उत्साह वाढला.

आयुष्यातील सर्वात मोठी जाणीव म्हणजे स्वतः प्रती प्रामाणिक राहणे यावर भर राहिला तसेच खाण्याच्या लालसेवर बऱ्यापैकी नियंत्रण आले तसेच शिस्त अंगीकारणे, मनोवृत्ती सुधारली.

या संपूर्ण प्रवासात सातत्याने मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिल्याबद्दल मी डॉ. दीक्षित आणि श्रीनिवास बोलाबत्तीन सर, मेघना भिडे मॅडम, स्वाती कुलकर्णी मॅडम आणि तमाम सदस्यांचे व सहभागी सर्व सहकाऱ्यांचे मनापासून आभारी आहे.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे प्रथम श्रीनिवास बोलाबत्तीन सर यांना प्रत्यक्ष ज्या वेळी भेटलो तेव्हा माझ्यात जो थोडाफार मी पणा होता तो पण एकदम गळून पडला.

 

(मराठी संकलन : श्रीनिवास बोलाबत्तीन)

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts