आजची यशोगाथा : अजय ठोमरे (८ ऑक्टोबर २०२६)

0

आजची यशोगाथा : अजय ठोमरे (८ ऑक्टोबर २०२६)

परिचय पत्र

नाव: अजय ठोमरे
वय: ५४ वर्ष
उंची: १७७ सेंटीमीटर
व्यवसाय: प्राध्यापक
वास्तव्य: नागपूर
समूह: DRC Nagpur
मोबाईल: ९८६०९५१८५२

मला साधारण कोरोना नंतर २०२१ मध्ये व त्यानंतर वेळोवेळी केलेल्या रक्त चाचणीत मधुमेह (एचबीएवनसी ८.० ते ८.२%) असल्याचे निदान झाले. मला सतत लघवी लागणे, रात्री सलग झोप न लागणे, थोड्या थोड्या वेळाने भूक लागणे आणि वजन जास्त असल्याने पोटऱ्या दुखणे, ह्या शारीरिक तक्रारी सोबत पोटाचा घेर वाढला होता.
मात्र त्यावेळी कौटुंबिक, आर्थिक व इतर विवंचनेतून दुर्लक्ष झाले.
असेच मार्च २०२५ मधे केलेल्या रक्त चाचणीत एचबीएवनसी ९.४% आले. आता मात्र दुर्लक्ष न करता ह्यावर चिंतन सुरु केले. ह्यासाठी कुठले औषध व बाजारातील उपलब्ध विविध उपाय ह्यावर मंथन सुरु होते. सहज शक्य, नियमित करता येण्यासारखा व आर्थिक दृष्टया स्वस्त पण परिणामकारक अश्या उपायांचा शोध सुरु होता.
आमच्या काही मित्रांचे ह्यावरील प्रयोग व परिणाम आम्ही बघितले होते. त्यातून डॉ. जगन्नाथ दीक्षित ह्यांच्या सहजसोपे, मधुमेह मुक्ति अभियानात आम्ही सामील होण्याचे ठरविले. त्यासाठी आठवड्याभरात डॉ. दीक्षित सरांचे मधुमेह मुक्ती वरील विविध व्हिडीओ बघितले.
दिनांक १५ एप्रिल २०२५ ला ही जीवनशैली सुरु केली तेंव्हा माझे एचबीएवनसी ९.४% होते, वजन ९०.७ किलो होते व पोटाचा घेर १२२ सेंटीमीटर होता.

सकाळी ६ वाजता जेवढे जमेल तेवढे फिरणे. काळा चहा, त्यानंतर ताक व दुपारचे जेवण १२:३० चे सुमारास घेऊन पुन्हा दुपारी ताक, सायंकाळी काळा चहा व रात्री ८ वाजता जेवण असे दररोजचे वेळापत्रक सुरु केले. साखर, गोड पदार्थ व गोड फळे पूर्णतः बंद केली.
सात महिन्यानंतर दिनांक १ डिसेंबर रोजी एचबीएवनसी ६.९ (२. ५ कमी), वजन ८४.० किलो (६.७ किलो कमी), पोटाचा घेर १०१ cm (११ cm ने कमी) झाला.
१५ महिन्यांनंतर, १६ जुलै २०२६ रोजी माझे एचबीएवनसी ६.१ झाले (३.३ ने कमी), वजन ८२.० किलो झाले (८.७ किलो कमी), कंबरेचा घेर ९५ सेमी झाला (एकूण२२ सेमीने कमी) आणि मानेचा घेर ४१ सेमीवरून ३८ सेमीपर्यंत कमी झाला.
काखेतील काळे डाग कमी झाले. कपडे सैल झाले व डॉ दीक्षित सरांनी सांगितल्याप्रमाणे माझ्या लग्नाचे जाकीट १८ वर्षाने पुन्हा घालता आले.
मी जेवणात सुरवातीला शेंगदाणे/ अक्रोड/ बदाम त्यानंतर प्रोटीनसाठी मोड आलेली कडधान्य / सोया वडी, मग सलाद , त्यानंतर पोळी, वरण, भाजी, भात अश्या प्रकारे आहार घेतो. सायंकाळी ज्वारी, बाजरीची भाकर घेतो.
ह्यासाठी कुठलाही खर्च व महागड़े औषधी व बाजारातील अन्नद्रव्य विकत आणावे लागले नाही. उलट खर्च कमी झाल्यामुळे बचत झाली. ही जीवन शैली इतकी सहज साध्य व सोपी आहे कि आम्हाला काहीही त्रास न होता मधुमेह कमी करता आला.
डॉ. दीक्षित सरांचे मनापासून धन्यवाद व ऋणी आहोत. नागपूरच्या केंद्रावरील डॉ. शीतल साने मॅडम ह्यांचे बहुमोल मार्गदर्शन तसेच समुपदेशक सौ. मृणालिनी घाटोळ ह्यांचा सल्ला लाभला. विशेषतः, केंद्रावरील सहकारी सौ. श्वेता व श्री. अक्षय ह्यांची हसतमुखाने मदत झाली.

(मराठी पुनर्लेखन: डॉ रत्नाकर गोरे)

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

Related Posts