आजची यशोगाथा : रामप्रताप हिवाळे
परिचय पत्र
नाव: रामप्रताप हिवाळे
वय: ८४ वर्षे
उंची: १६२.५ सेंटीमीटर
वास्तव्य: पुणे
व्यवसाय: निवृत्त शासकीय अधिकारी
समूह: अचिव्हर्स
मोबाईल: ७५११७५६८१२
मला डॉ. दीक्षित सरांच्या जीवनशैलीविषयी तसेच ९० दिवसांच्या चॅलेंजविषयी माहिती श्री. योगेश सरांच्या “फॅन” समूहामार्फत मिळाली. मी त्या समूहाचा सदस्य असल्यामुळे ही संधी समजताच माझा मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी या चॅलेंजमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला.
दि. १ फेब्रुवारीपासून चॅलेंज सुरू होणार असल्याचे समजल्यानंतर मी पूर्ण मनापासून आणि शिस्तबद्ध पद्धतीने हे चॅलेंज पूर्ण करण्याचा निर्धार केला. व्हॉट्सअप वरील मार्गदर्शन आणि अहवालांच्या आधारे मला अचिव्हर्स समूहामध्ये सहभागी करून घेण्यात आले.
चॅलेंजच्या संपूर्ण कालावधीत मी समूहाची सर्व शिस्त काटेकोरपणे पाळली. दररोज सकाळी दोन तास चालण्याचा व्यायाम केला. दोन्ही वेळच्या जेवणाचे छायाचित्र वेळेवर दोन्ही समूहांवर पाठविले. तसेच दररोज सकाळी १०:३० वाजेपर्यंत मॉर्निंग वॉकचा स्क्रीनशॉट आणि दैनंदिन शारीरिक क्रियाकलापांचा अहवाल नियमितपणे समूहावर पाठविला.
पहिल्याच महिन्यात माझे वजन २ किलोग्रॅमने कमी झाले. मी नाश्ता आणि चहा पूर्णपणे बंद केला तसेच गोड पदार्थांचे सेवन पूर्णतः थांबविले. त्यानंतर खाण्यापिण्यात शिस्त आली आणि त्याचे सकारात्मक परिणाम जाणवू लागले.
९० दिवसांनंतर प्राप्त झालेले परिणाम
HbA1c: ६.४ टक्के → ५.८ टक्के
वजन: ६३ किलोग्रॅम → ५७ किलोग्रॅम
कंबरेचा घेर: १०१ सेंटीमीटर → ९१ सेंटीमीटर
फास्टिंग इन्सुलिन : १३.४० IU/mL → ६.५० IU/mL
या चॅलेंजमुळे माझ्या आयुष्यात झालेला सर्वात मोठा बदल म्हणजे खाण्यावर आलेले नियंत्रण. मी गोड पदार्थ पूर्णपणे बंद केले. जेवणाची योग्य सुरुवात कशी करावी, जेवण किती वेळात पूर्ण करावे, तसेच प्रथिने (Protein) आणि स्निग्ध पदार्थ (Fat) यांचे महत्त्व समजले. या सर्व सवयींचे सातत्याने पालन केल्यामुळे माझ्या आरोग्यामध्ये लक्षणीय सुधारणा झाली.
या संपूर्ण प्रवासात सातत्याने मार्गदर्शन, प्रेरणा आणि प्रोत्साहन दिल्याबद्दल डॉ. दीक्षित सर तसेच आमच्या समूहाचे प्रमुख श्री. विजय राठोड आणि मेघना मॅडम यांचे मी मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. सुरुवातीला काही अडचणी आणि शंका होत्या; परंतु त्यांच्या योग्य मार्गदर्शनामुळे त्या दूर झाल्या आणि माझ्या आयुष्यात हा सकारात्मक बदल घडून आला.
योग्य जीवनशैली, शिस्त आणि सातत्य यांचा अवलंब केल्यास कोणत्याही वयात उत्तम आरोग्य प्राप्त करता येते, याचा मी स्वतः अनुभव घेतला .
(मराठी संकलन: डॉ. रूपाली अतुल बोंद्रे)


