आजची यशोगाथा : वैभव बोरगावकर
परिचय पत्र
नाव: वैभव बोरगावकर
वय: ४० वर्षे
उंची: १७५ से.मी.
वास्तव्य: पुणे
समूह: Achievers
मोबाईल: ९६६५६४४६६६
वजन कमी करणे, पोटावरील चरबी घटवणे, HbA1c कमी करणे आणि आरोग्यासाठी कायमस्वरूपी उपाय शोधणे या उद्देशाने मी डॉ. दीक्षित लाइफस्टाइल वेट लॉस चॅलेंजमध्ये सहभागी झालो.
मधुमेह नियंत्रण आणि वजन कमी करण्याविषयी माहिती शोधताना मला यूट्यूबवर डॉ. दीक्षित यांचे व्हिडिओ पाहायला मिळाले. त्यामागील शास्त्रीय दृष्टिकोन समजल्यानंतर मी ही जीवनशैली स्वीकारण्याचा निर्णय घेतला. माझा एक मित्र आधीपासून ही जीवनशैली पाळत होता. त्याच्या सकारात्मक अनुभवामुळे आणि प्रोत्साहनामुळे मला चॅलेंजमध्ये सहभागी होण्याची प्रेरणा मिळाली.
सुरुवातीला माझे वजन ८३.३ किलो, कंबरेचा घेर ११० सें.मी., HbA1c ६.० आणि फास्टिंग इन्सुलिन १३.६ होते. मी १५ जानेवारीपासून तयारी सुरू करून १ फेब्रुवारीपासून चॅलेंजला सुरुवात केली.
आमच्या Achievers ग्रुपमधील अंजली मॅडम, श्रीकांत सर, मेघना मॅडम आणि सर्व अॅडमिन्स यांनी सातत्याने मार्गदर्शन व प्रेरणा दिली. योग्य प्रमाणात, योग्य क्रमाने आणि योग्य वेळी आहार घेण्याचे मार्गदर्शन माझ्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरले. ग्रुपमधील सकारात्मक वातावरण आणि सदस्यांनी शेअर केलेले व्यायामाचे अपडेट्स यामुळे रोज प्रेरणा मिळत राहिली.
या जीवनशैलीमुळे माझे वजन ८३.३ वरून ७७ किलो, कंबरेचा घेर ११० वरून १०२ सें.मी., HbA1c ६.० वरून ५.५, तर फास्टिंग इन्सुलिन १३.६ वरून ६.६६ पर्यंत कमी झाले. त्यामुळे मी प्री-डायबेटिक अवस्थेतून बाहेर पडलो आणि माझा आत्मविश्वास वाढला.
या यशासाठी मी डॉ. दीक्षित सर, Achievers ग्रुपचे सर्व अॅडमिन्स आणि Adore Trust टीमचा मनःपूर्वक आभारी आहे. निरोगी आयुष्यासाठी ही जीवनशैली मी कायमस्वरूपी पाळत राहीन.
(मराठी संकलन: रविंद्र ढवळीकर)


