आजची यशोगाथा : ट्विंकल कचारिया (२९ ऑगस्ट २०२६)
परिचय पत्र
नाव: ट्विंकल कचारिया
वय: ३२ वर्ष
उंची: १६६ सेंमी
वास्तव्य: पुणे
व्यवसाय: चार्टर्ड अकाउंटंट (CA)
समूह: अचिव्हर्स (Achievers)
मोबाईल: ९४२०७०४८४७
मला पीसीओडी, आम्लपित्त, वजन वाढणे आणि मानसिक तणाव यांसारख्या आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागत होता, ज्यांचा माझ्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होत होता.
माझ्या या आरोग्यविषयक समस्यांमुळे माझ्या कामाचा आणि वैयक्तिक आयुष्याचा समतोल बिघडला होता.
एका मैत्रिणीच्या माध्यमातून मला डॉ. दीक्षित जीवनशैली आणि ‘९०-दिवसीय आव्हान’ बद्दल माहिती मिळाली.
जेव्हा मला समजले की हे चॅलेंज १ फेब्रुवारी २०२६ रोजी सुरू होणार आहे,
तेव्हा मी यात सहभागी होण्याचा पक्का निर्णय घेतला.
माझ्या कामाचे स्वरूप पाहता माझ्यावर कामाचा प्रचंड ताण होता,
तरीही माझ्या आरोग्यासाठी याला एक संधी देण्याचा मी निश्चय केला.
मी पूर्ण निष्ठेने यात सहभागी राहिले; जेवणाचे फोटो आणि व्यायामाचे अद्यतन सामायिक केले,
तसेच या कार्यक्रमात शिकवलेल्या शिस्तीचे काटेकोरपणे पालन केले.
पहिल्या महिन्यात,
पहिल्या महिन्यात माझे ४ किलो वजन कमी झाले.
पीसीओडी ची समस्या आणि मानसिक आरोग्यात खूप सुधारणा झाली. किडनी स्टोन समस्याही नियंत्रणात येऊ लागली.
पुढील महिन्यात पायाला मुरगळ आल्यामुळे मी चालू शकत नव्हते, पण गट प्रशासक श्रीकांत डंके यांनी मला डॉ. रत्ना मॅडम यांचे खुर्चीवर बसून करायचे व्यायाम करण्याचा सल्ला दिला, ज्याचा मला खूप फायदा झाला.
आरोग्य सुधारण्यासाठी आवश्यक असलेले जीवनशैलीतील बदल मी हळूहळू आत्मसात करत आहे.
९० दिवसांच्या अखेरीस:
HbA1c: ५.७ → ५.४ %
वजन: ८० → ७४.२ किलो
कंबर : ९४ → ९० सेमी
फास्टिंग इन्सुलिन: १२.३९ → ११
इतर सुधारणा:
आव्हान शेवटी, मला ताजेतवाने आणि उत्साही वाटत आहे.
माझी आम्लपित्त कमी झाली आहे.
मला झालेली सर्वात महत्त्वाची जाणीव म्हणजे – सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच उत्तम आरोग्य प्राप्त होते.
शिस्तीमुळे सकारात्मक दृष्टिकोन मिळतो.
या जादुई जीवनशैलीची ओळख करून दिल्याबद्दल मी डॉ. दीक्षित यांचे मनापासून आभार मानते. तसेच, योग्य मार्गदर्शन आणि पाठिंबा दिल्याबद्दल गट प्रशासक श्रीकांत डंके आणि मुख्य समिती सदस्य संजय मोरे सर व कीर्ती लांडे मॅडम यांचेही मी आभार मानते. येत्या काळात मधुमेहमुक्त आणि निरोगी व्यक्ती बनण्यासाठी मी ही जीवनशैली पाळत राहीन.
(मराठी भाषांतर: मृगेंदु जोशी)


