आजची यशोगाथा : हेमलता मोरे (२४ऑगस्ट २०२६)
परिचय पत्र
नाव: हेमलता मोरे
वय: ६७ वर्ष
उंची: १५५ सेमी
व्यवसाय: निवृत्त शिक्षिका/ प्राध्यापिका
वास्तव्य: पुणे
समूह: अचीवर्स
मोबाईल: ९८२२३७१९६४
काही वर्षांपूर्वी मी ९० दिवसाचे चॅलेंज केले होते. त्यामुळे डॉक्टर दीक्षित जीवनशैली आणि चॅलेंजमध्ये पाळावयाची शिस्त याबद्दलची माहिती मला होती.
यावेळी दोन गोष्टींसाठी मला पुन्हा एकदा ९० दिवसाच्या चॅलेंजमध्ये सामील व्हायचे होते.
पहिली गोष्ट म्हणजे मला पूर्व मधुमेहीतून मधुमेह मुक्त व्हायचे होते.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे थोडेसे वजन कमी करायचे होते जेणेकरून दैनंदिन जीवनक्रम सुरळीत पार पडेल.
त्यामुळे मी ९० दिवसाच्या चॅलेंज मध्ये सामील झाले आणि फार काही अडचण न येता ते चॅलेंज पार पाडले.
मध्येच येणाऱ्या गुढीपाडव्याला सुद्धा गोड पदार्थ मी पूर्णपणे टाळू शकले.
इतर सदस्यांच्या जेवणाच्या फोटो बरोबरच माझ्या जेवणाचे फोटो रोजच्या रोज शेअर केले.
न चुकता व्यायाम केला.
प्रोग्राम मध्ये शिकवलेल्या सर्व सवयी अंगीकारल्या.
९० दिवसानंतर मला मिळालेले परिणाम याप्रमाणे आहेत…
सुरुवातीचे एच बी ए वन सी ६.३ होते, ते कमी होऊन ६.१ झाले.
सुरुवातीचे वजन ७० किलो होते ते
६७ किलोपर्यंत उतरले.
कमरेचा घेर ९९ सेमी हून कमी होऊन ९६ सेमी झाला.
उपाशी पोटी चे इन्सुलिन १७.७ पासून २५.६ पर्यंत बदलले.
जीवनशैली पालन करत असल्याने एकूणच शिस्त चांगल्या प्रकारे पाळता येते, हे लक्षात आले.
दोन जेवणाच्या मधील खाण्यावर चांगलेच नियंत्रण मिळवता आले.
हीच जीवनशैली मी कायमस्वरूपी ठेवणार आहे आणि लवकरच मधुमेह मुक्त होणार आहे.
या संपूर्ण प्रवासात सातत्याने मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिल्याबद्दल मी डॉक्टर दीक्षित आणि समूहाचे एडमिन व कोअर कमिटी यांची मनापासून आभारी आहे.
(मराठी संकलन: आरती मोने)


