आजची यशोगाथा : तनय बोकील
परिचय पत्र
नाव: तनय बोकील
वय: ३९ वर्ष
उंची: १७३ सेंमी
व्यवसाय: स्वतंत्र
वास्तव्य: पुणे
समूह: अचीवर्स
मोबाईल: ९८२३०९६५५०
गेल्या काही वर्षापासून तब्येतीच्या बऱ्याच तक्रारींनी मी हैराण होतो. तब्येतीच्या तक्रारी म्हणजे वाढलेला रक्तदाब, मधुमेह ,वाढलेले वजन आणि सांधेदुखी इत्यादी इत्यादी. आणि या सर्वांमुळे माझे रोजचे जीवन सुरळीतपणे चालू ठेवण्यासाठी खूपच अडथळे येत होते आणि म्हणूनच मी एखादा उपाय मिळतो का त्या शोधात असतानाच अचानक मला डीआरसीसी या समूहा च्या माध्यमातून डॉक्टर दीक्षित जीवनशैली आणि त्यांचं ९० दिवसांचं आव्हान याबद्दल माहिती मिळाली
हे आव्हान १ फेब्रुवारी २०२६ या दिवसापासून सुरू होणार आहे हे कळल्याबरोबरच मी पक्का निश्चय केला की आपण या वेळेला यामध्ये सहभागी व्हायचे. पण खरं सांगायचं तर माझे कुटुंबीय आणि मित्रमंडळी माझ्या या निश्चयाबद्दल साशंक होते कारण लगेचच काही सण येऊ घातले होते जसे की होळी. पण मी मात्र पक्का निश्चय केला होता की हे आव्हान स्वीकारायचे आणि त्याप्रमाणे मी अतिशय निर्धाराने यामध्ये सामीलही झालो आणि रोजच्या जेवणाचे फोटो, व्यायामाचे फोटो आणि त्याचबरोबर इतर ज्या काही शिस्तीमध्ये बसणाऱ्या गोष्टी होत्या त्या सगळ्या मी कसोशीने पाळल्या. अगदीच खरं सांगायचं म्हणजे काही वेळेला रोजचे गुगल फॉर्म भरून देण्यामध्ये माझ्याकडून कधी कधी उशीर पण होत असे.
तरीही ९० दिवसानंतर मला मिळालेले परिणाम याप्रमाणे आहेत…
एच बी ए वन सी आहे तितकेच म्हणजे ५.७ राहिले .
सुरुवातीचे १२७ किलो वजन उतरून ते १२३ किलो झाले.
कमरेचा घेर १३४ सेमी वरून कमी होऊन १३३ सेमी झाला.
उपाशी पोटी चे इन्सुलिन ३९.६० वरून कमी होऊन १७.३० झाले.
याबरोबरच मला झालेला सर्वात मोठा फायदा असा की अधून मधून तोंडात टाकण्याच्या सवयीवर अतिशय नियंत्रण मिळवता आले, शिस्त पाळता आली आणि मानसिक आरोग्य सुधारले.
मी अत्यंत मनःपूर्वक डॉक्टर दीक्षित अंजली पाठक मॅडम, चिंतामणी बोडस सर, श्रीकांत डंके सर आणि अचीवर समूहाचे सर्व ॲडमिन या सर्वांचा आभारी आहे, ज्यांनी मला सतत मार्गदर्शन केले व प्रोत्साहन दिले.
(मराठी संकलन: आरती मोने)


