आजची यशोगाथा : सनी मानकोसकर
परिचय पत्र
नाव: सनी मानकोसकर
वय: ४० वर्ष
उंची: १८४ सेंमी
वास्तव्य: पुणे
व्यवसाय: बिझनेस
समूह: अचिव्हर्स
मोबाईल: 8446102502
वाढते वजन माझ्या दैनंदिन जीवनावर परिणाम करत होते आणि मला कायमस्वरूपी उपाय हवा होता. एका मित्रामार्फत मला डॉ. दीक्षित लाइफस्टाइल आणि ९० दिवसांच्या चॅलेंजची माहिती मिळाली.
१.०२.२०२६ पासून चॅलेंज सुरू होणार असल्याचे समजताच, व्यवसायातील प्रचंड व्यस्तता असूनही मी सहभागी होण्याचा ठाम निर्णय घेतला. माझ्या आरोग्याला प्राधान्य देण्याचा निर्धार केला.
चॅलेंजदरम्यान मी नियमितपणे जेवणाचे फोटो, व्यायामाचे अपडेट्स शेअर केले आणि कार्यक्रमातील शिस्त पाळली. पहिल्याच महिन्यात ३ किलो वजन कमी करून माझा पहिला टप्पा पूर्ण केला. या जीवनशैलीमुळे वजनाबरोबरच कमरेचाही घेर कमी होऊ लागला.
कामाच्या व्यापामुळे काही दिवस चालण्याची सवय खंडित झाली. मात्र ग्रुप ऍडमिन श्रीकांत डंके सर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मी पुन्हा नियमित दिनचर्येला सुरुवात केली. हळूहळू या जीवनशैलीतील सवयी माझ्या आयुष्याचा भाग बनल्या.
९० दिवसांच्या शेवटी माझ्या आरोग्यात लक्षणीय सुधारणा झाली:
एचबीएवनसी: 5.1 → 4.8
वजन: 109 → 105 किलो
कंबर: 110 → 109 से.मी.
फास्टिंग इन्सुलिन: 37.4 → 17.8
याशिवाय ऍसिडिटी कमी झाली, ताजेतवाने आणि उत्साही वाटू लागले. सातत्य आणि शिस्त यामुळे उत्तम आरोग्य आणि सकारात्मक विचारसरणी मिळते, ही माझी सर्वात मोठी शिकवण आहे.
डॉ. दीक्षित सर, ग्रुप ऍडमिन श्रीकांत डंके सर, अंजली मॅडम, बोडस सर आणि कोअर कमिटीचे मनःपूर्वक आभार. माझ्या पत्नीनेही या चॅलेंजमध्ये सहभागी होऊन मला खूप साथ दिली.
मी पुढेही ही जीवनशैली कायम ठेवून निरोगी आणि मधुमेहमुक्त जीवन जगण्याचा प्रयत्न करणार आहे.
(मराठी अनुवाद: रविंद्र ढवळीकर)


