आजची यशोगाथा : मंगेश जोशी (१२ऑगस्ट २०२६)
परिचय पत्र
नाव – मंगेश जोशी
वय – ५१ वर्षे
उंची – १६८ सेमी
वास्तव्य – पुणे
समूह – चॅलेंज ८ / अचिव्हर्स
व्यवसाय – नोकरी
मोबाईल – ९६८९९३११७१
मला माझ्या वाढलेल्या वजनाची चिंता वाटत होती आणि मी वजन कमी करण्याचा उपाय शोधत होतो.
मी यूट्यूबवर अनेक व्हिडिओ पाहिले आणि तेव्हा मला डॉ. दीक्षित लाइफस्टाइल बद्दल माहिती मिळाली. मी डॉ. दीक्षित यांच्या ‘मधुमेह मुक्ती’ विषयीचे अनेक व्हिडिओ पाहिले, पण ही जीवनशैली सुरू करण्यासाठी मला नेमकी प्रेरणा मिळत नव्हती.
एके दिवशी माझ्या एका मित्राने मला डॉ. दीक्षित यांच्या आगामी ‘वेट लॉस चॅलेंज’बद्दल आणि त्यात कसे सामील व्हायचे याबद्दल माहिती दिली.
मी माझी एच बीए १सी आणि ‘फास्टिंग इन्सुलिन’ची चाचणी केली आणि ८ व्या ‘वेट लॉस चॅलेंज’साठी नाव नोंदवले.
एका महिन्यात माझे ५.४ किलो वजन कमी झाले; २७ जानेवारी रोजी माझे वजन ९३.५ किलो होते आणि फेब्रुवारीच्या अखेरीस ते कमी होऊन ८८.१ किलो झाले.
हा निकाल माझ्यासाठी खूपच आश्चर्यकारक होता. या एका महिन्यात मी सर्व सूचनांचे पालन केले, योग्य आहार घेतला आणि चालण्याचा व्यायाम केला. मी पुन्हा धावण्याचा सरावही सुरू केला. जिममधील व्यायामादरम्यान माझी ताकदही वाढली. आम्हाला ही अद्भुत जीवनशैली दिल्याबद्दल डॉ. दीक्षित सर आणि त्यांच्या टीमचे आभार.
ग्रुप ॲडमिन्सच्या प्रोत्साहनामुळे मी दररोज चांगल्या वेगाने ४.५ किमीपेक्षा जास्त अंतर चालू शकलो.
चॅलेंजचे दोन महिने पूर्ण झाल्यानंतर माझे एकूण ७.७ किलो वजन कमी झाले होते, जे माझ्यासाठी खूप आश्चर्यकारक होते; कारण यापूर्वी मी इतर पद्धतींनी वजन कमी करण्याचा अनेकदा प्रयत्न केला होता. दिवसभर मला खूप उत्साही आणि ऊर्जावान वाटत होते आणि माझी झोपही सुधारली होती.
डॉ. दीक्षित सर आणि त्यांच्या टीमचे त्यांच्या पाठिंब्याबद्दल आणि सहकार्याबद्दल आभार.
यामुळे मला माझे वजन ८३.२ किलोपर्यंत खाली आणण्यास मदत झाली.
या अद्भुत जीवनशैलीबद्दल मी डॉ. दीक्षित सर, तसेच सर्व ग्रुप ॲडमिन्स आणि कोअर टीमचा अत्यंत ऋणी आहे.
मी ही जीवनशैली पाळणे सुरूच ठेवेन, माझी एच बीए १सी पातळी ५.७ च्या खाली आणेन आणि एक दिवस मधुमेहातून पूर्णपणे मुक्त होईन.
वजन आणि शरीराच्या मापांमध्ये लक्षणीय घट झाल्यामुळे माझी ऊर्जा पातळीही वाढली. तपशील जोडलेल्या तक्त्यात दिले आहेत.
पुन्हा एकदा धन्यवाद.
(मराठी अनुवाद: अनिरुद्ध दिवेकर)


