आजची यशोगाथा : मनोज घोडके
परिचय पत्र
नाव: मनोज घोडके
वय: ५७ वर्षे
उंची: १५५ सेंमी
व्यवसाय: फॅबरिकेशन कंपनी
वास्तव्य: पिंपरी चिंचवड
समूह: वाऱ्रिअर्स ग्रुप, ८ वा चॅलेंज
मोबाईल: ९०११०९२०७१
मला २०१८ पासून मधुमेह व उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. यामुळे मला अंगदुखी सांधेदुखी व वजन वाढीचे समस्याने मी त्रस्त झालो होतो. मी २०२१ पासून डॉ दीक्षित जीवनशैली चे पालन करत आहे. मी या अगोदर दोन वेळा ९० दिवसीय चॅलेंज मध्ये भाग घेतला होता. त्यावेळेस सुद्धा मला खूप छान रिजल्ट आले होते. यावेळच्या चॅलेंजची घोषणा DRCC ग्रुप मध्ये झाल्यानंतर मी माझे नाव त्वरित नोंदवले. यावेळचे चॅलेंज एक फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होणार होते. त्यात मी माझ्या पत्नीलाही प्रोत्साहन देऊन सहभागी केले व आम्ही दोघांनीही यावेळचे चॅलेंज खूप यशस्वीरीत्या पूर्ण केले.
आम्ही दोघांनी या वेळेस ९०% शिस्त पाळली. काही कारणास्तव बाहेरगावी गेल्यानंतर शिस्त पाळता आली नाही. त्यामुळे त्यात खंड पडला परंतु दुसऱ्या दिवसानंतर परत आम्ही शिस्त पाळली. त्यामुळे आम्हा दोघांनाही चांगले रिजल्ट मिळाले. विशेष म्हणजे यावेळी मी माझ्या भुकेवर ताबा ठेवू शकलो.
तीन महिन्यात झालेली प्रगती –
सुरूवातीचे एचबीए१सी ७.४ होते ते ६.७ झाले. (०.७% कमी)
सुरुवातीचे वजन – ७३ किलो होते ते ६८.५ किलो झाले. (४.५ किग्रा कमी)
कमरेचा घेर १०५ सेमी होता तो ९१ सेमी झाला. (१४ सेंमी कमी)
उपवास इंसुलिन ४५.४ होते ते ११.८ झाले. (३३.६ यूनिट कमी)
या सर्व प्रवासात मला डॉ. दीक्षित सरांचे, तसेच अॅडमिन कविता मेहंदळे मॅडम, मीनल डोणगावकर मॅडम, मेघना भिडे मॅडम यांचे खूप सहकार्य मिळाले. त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे हा प्रवास खूप छान झाला व हा प्रवास यापुढे मी असाच चालू ठेवण्याचा खूप प्रयत्न करेन.
(मराठी संपादन: श्रीनिवास बोलाबत्तीन)


